शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांच्या किमतींवर नियंत्रण ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:54 IST

खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किंमतीत कंपन्यांनी वाढ केली. खतांच्या या भाव वाढीचा परिणाम उत्पादन खर्चावर होणार असल्याने रासायनिक खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी दिलेल्या निवेदनातून केली. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्वीकारले.

ठळक मुद्देमागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किंमतीत कंपन्यांनी वाढ केली. खतांच्या या भाव वाढीचा परिणाम उत्पादन खर्चावर होणार असल्याने रासायनिक खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी अ‍ॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी दिलेल्या निवेदनातून केली. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी स्वीकारले.दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाच्या शेतीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. शेतमालाच्या किमती मात्र स्थिर आहेत. शेतीला लागणाऱ्या निविष्ठांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने उत्पादन खर्चात कमालीची वाढ होणार आहे.खतविक्रीतून कंपन्या शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची सबसिडी लाटतात. त्यामुळे खत विक्रीसाठी पॉस मशीनचा प्रयोग राबविण्यात आला. शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी केल्यानंतरच खतावरील अनुदान कंपनीला मिळणार आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सबसिडी चोरीला आळा बसला; मात्र दुसरीकडे खतांचे दर वाढविले आहे. युरिया वगळता इतर सर्व अनुदानित खतांच्या किंमतीत वाढ केली आहे.वर्धा जिल्ह्यात कापूस शेतीचे मोठे क्षेत्र असते. खताच्या एका बॅग मागे १०० ते २५० रुपये भाव वाढल्याने प्रती एकरी एक ते दोन हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर सरकारने दिलासा देण्याऐवजी खतांची दरवाढ केल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात नाराजी आहे.१०.२६.२६ या खताची ५० किलोची बॅग १२३५ रुपयांत मिळायची, ती आता १३४० रुपये किमतीची घ्यावी लागणार आहे. १०५ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे. डीएपीच्या बॅगचे ११० रुपयांनी भाव वाढले आहे. १२.३२.१६ खताची बॅग १२४० रुपयींची होती. यात ११० रुपयाची वाढ झाली आहे.तर पोटॅश बॅगची २०० रुपयांनी किंमत वाढून ९०० रुपये झाले आहे. अन्य खतांच्या किंमतीतही १०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. यावर नियंत्रण आणून शेतकयांना दिलासा द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. काशीकर, राकेश पांडे, अमोल गेडाम, शुभम जळगावकर, मनीष भुजाडे, सागर घोडे, अक्षय पटेल, रोहित बैस, प्रेम मडावी यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.नियोजन कोलमडण्याची भीतीतीन वर्षांपासून नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवत आहेत. यंदाही दुष्काळी परिस्थिती आहे. रासायनिक खतांच्या भडकलेल्या किंमतींमुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. खरीप हंगामावरच शेतकरी वर्षभराचे नियोजन करतो. रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे नियोजन कोलमडून हाही हंगाम हातून जातो की काय, अशी भीती यावेळी शेतकºयांनी व्यक्त केली.