शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:19 IST

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाने कंत्राटी पद्धतीवर विविध पदांवर कार्यरत कर्मचाºयांच्या सेवा नियमित न करण्याचा आदेश पारीत केला.

ठळक मुद्देनियमित न करण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी

ऑनलाईन लोकमतवर्धा : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाने कंत्राटी पद्धतीवर विविध पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित न करण्याचा आदेश पारीत केला. हा आदेश सदर कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. तो त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी बुधवारी विविध शासकीय कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन केले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.वर्धा जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मागील २० वर्षांपासून राज्यातील विविध विभागात कंत्राटी पद्धतीने विहित प्रक्रिया करून आमची निवड करण्यात आली आहे. तेव्हापासून संबंधित विभागाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी आम्ही कार्य करीत आहोत. सदर कामाचा आम्हाला अल्प मोबदला मिळत असला तरी त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी असताना अन्यायकारक शासन निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक कंत्राटी कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने निकालही दिले आहेत. त्यावर कोणतीही कार्यवाही राज्य शासनाकडून करण्यात आली नाही. शासनाच्या नवीन परिपत्रकामुळे कंत्राटी पद्धतीने काम करणाºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. संपूर्ण राज्यात प्रत्येक दहा घरामागे एक कंत्राटी कर्मचाºयांचे कुटुंब आहे. परिपत्रकातील जाचक अटींमुळे राज्यातील २५ टक्के कुटुंब प्रभावित होणार आहे. यामुळे ९ फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला शासन निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.आंदोलनात सचिन खाडे यांच्या नेतृत्वात अन्नपूर्णा ढोबळे, प्रभाकर पाटील, डॉ. छन्ना रेभेकर, चौधरी, विशाल राऊळ, राहूल चौके, यादव पोटरकर यांच्यासह मोठ्या संख्येने विविध शासकीय कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.