शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाºयांचे असहकार आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:03 IST

अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन वाढ देत त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पंकजा मुंडे यांनी अधिवेशन काळात दिले होते.

ठळक मुद्देमासिक सभेवर बहिष्कार : प्रशासनाला दिली संपाची नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन वाढ देत त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पंकजा मुंडे यांनी अधिवेशन काळात दिले होते. ते आश्वासन पाळले नसल्याने अंगणवाडी सेविकांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. वर्धेत याचा शुभारंभ हिंगणघाट येथील बैठकीवर बहिष्कार टाकून करण्यात आला.विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात मानधन वाढ करण्यात येईल, असे आश्वासन अंगणवाडी कर्मचाºयांच्या दिले होते. राज्यातील प्रमुख सात संघटनेच्या कृती समितीने शासनाने गठीत केलेल्या कमेटीला आपला अहवाल ७ जून रोजी सादर केला. आठ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून मानधन वाढीचे आश्वासन हवेत विरले. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी असहकार आंदोलन सुरु केले असून कुठल्याही शासकीय बैठकीत सहभागी होणार नाही. शिवाय त्या मासिक अहवालही देणार नसल्याचे त्यांनी कळविले आहे. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास ११ सप्टेंबर पासून दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावार जातील अशी नोटीस त्यांनी दिली आहे.वर्धा जिल्ह्यातील २,२०० कर्मचाºयांनी २२ आँगस्ट पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. समुद्रपूर व हिंगणघाट प्रकल्प अधिकारी यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तर बैठकीवर बहिष्कार करीत मासिक अहवाल देणार नाही, असे लिखीत दिले आहे. बिट व पीएचसी स्तरावरील बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ७०० महिलांना जून महिन्याचे मानधन मिळाले नाही. आँनलाईन मानधनाच्या चुकीच्या धोरणामुळे कमी मानधन खात्यात जमा करण्यात आले आहे. सर्व प्रकल्प कार्यालयातील लिपीक व अधिकारी यांना पीएफएमएस बाबत प्रशिक्षण देण्यात यावे अशी मागणी आयटक नेते दिलीप उटाणे यांनी आयुक्त एकात्मीक बाल विकास सेवा योजना मुंबई यांच्या कडे केली आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विजया पावडे, वंदना कोळणकर, ज्ञानेश्वरी डंबारे, मंगला इंगोले, सुनंदा आखाडे, वंदना खोबरागडे, मैना उईके, रेखा काचोळे, रंजना तांबेकर, सुरेखा रोहनकर, माला भगत यांच्यासह अंगणवाडी सेविकांनी केली आहे.