शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरची दुचाकीला धडक, एक ठार, दोन जखमी

By admin | Updated: January 25, 2017 00:48 IST

भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.

उड्डाण पुलावरील घटना : दुचाकीवर होते तिघे, एकाची प्रकृती चिंताजनक पवनार : भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात येथील उड्डाणपुलावर सोमवारी रात्री उशीरा झाला. योगेश साहेबराव देवघरे (२३) रा. कोरणाडा, जि. वाशीम असे मृतकाचे तर अंकित योगेश पांडे (२१) रा. क्षीरसमुद्र ता. सेलू आणि अमित चौधरी रा. रामनगर वर्धा अशी गंभीर जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार, योगेश देवघरे, अंकित पांडे व अमित चौधरी हे तिघे एमएच ३२ यू ९९८९ क्रमांकाच्या दुचाकीने वडगाव येथून वर्धेकडे येत होते. दुचाकी नागपूर-वर्धा मार्गावरील पवनार शिवारात आली असता वर्धेकडून नागपूरकडे जाणाऱ्या अज्ञात कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. अपघात होताच कंटेनर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने योगेश देवघरे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अंकित आणि अमित, हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. अमित चौधरी याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच सेवाग्राम ठाण्याचे संजय कापसे व कमलाकर सोनारकर यांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेत पंचनामा केला. अंकित पांडे यांच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे.(वार्ताहर) लागल्या होत्या वाहनांच्या रांगा वर्धा-नागपूर मार्गावरील पवनार शिवारातील उड्डाणपुलाजवळ कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघांची एकच गर्दी झाली होती. परिणामी, वर्धा-नागपूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सदर अपघातामुळे वर्धा-नागपूर मार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी वासूदेव बोंदरे, कर्मचारी दिलीप किटे, मंगेश वाघाडे, विलास लाडे यांनी घटनास्थळ गाठून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.