शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठेंगण्या पुलामुळे तुटतो सावंगी-देर्डा गावाचा संपर्क

By admin | Updated: August 1, 2016 00:27 IST

सावंगी व देर्डा या दोन गावांमधून नदी गेल्याने एका पुलाने हे दोन्ही गाव जोडले आहे;

नेहमीच होते वाहतूक ठप्प : उंची वाढविण्याची मागणी धुळखात सेवाग्राम : सावंगी व देर्डा या दोन गावांमधून नदी गेल्याने एका पुलाने हे दोन्ही गाव जोडले आहे; मात्र हा पूल आता ठेंगणा पडत असून पावसाळ्यात त्यावरून पाणी जाणे नित्याचेच झाले आहे. पुलावरून पाणी वाहत असताना या दोन गावांचा संपर्क तुटतो. यामुळे सदर पुलाची उंची वाढविण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून करण्यात आली असून याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. हमदापूर ते मांडगाव या मार्गावर अनेक गावे आहेत. यातील सावंगी व देर्डा या दोन गावाच्या मधून बोर व धाम नदी वाहत आहे. याच गावातील पुलाजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे. या संगमामुळे नदीचे पात्र विस्तारले आहे. या विस्तारीत पत्रावर मोठ्या पुलाची गरज असताना इथे ढोल्यांच्या रपट्याप्रमाणे पूल बनविण्यात आलेला आहे. या पुलाची उंची कमी असल्याने नदीचे पाणी नेहमीच पुलावरून वाहते. यामुळे नदीला पूर येताच दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. जुलै महिन्यात या नदीला तीनवेळा पूर आला. तिनही वेळा या पुरामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता. गुरुवारी सायंकाळी या पुराचे पाणी ओसरल्याने आवागमन सुरू झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. हमदापूर ते सावंगी या दरम्यान जेजूरी, बावापूर, आपटा, खुणी, नंदपूर आदी गावे आहेत. या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता व नागरिकांना बाजारासाठी हमदापूर येथे यावे लागत आहे; मात्र या नदीला असलेल्या पुरामुळे या गावातील नागरिकांना गावातून बाहेर येणे व बाहेरून गावात जाणे कठीण होत आहे. या त्रासापासून बचावाकरिता या पुलाची उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. या मागणीला बराच काळ झाला तरी याकडे शासनाचे मात्र कायम दुर्लक्ष आहे.(वार्ताहर) आष्टा-नांद्राचीही तीच समस्या हमदापूरच्या पुढे आष्टा व नांद्रा ही दोन गावे असून मधून बोर नदी वाहते. या दोन्ही गावांना जोडणारा सिमेंट रपटा नदीमधून असून नदी ते नांद्रा गावापर्यंतचे १५० मी. चे अंतर आहे. नांद्रा ते नदी यामध्ये फक्त ७५ मीटरचा सिमेंट रस्ता बनविण्यात आला आणि उर्वरीत मात्र कच्चा रस्ता आहे. दोन्ही गावाचा शाळा, बाजार, आरोग्य व अधिकोषसाठी हमदापूर या गावाशी संबंध असून नांद्रा वासीयांना आता तर पिंपळगाव मार्गे हमदापूर व वर्धा गाठावे लागते. नदीवरील रपटा नेहमीच पाण्याखाली असल्याने जाणे येणे बंद आहे. या समस्येमुळे गावकरी त्रस्त असून संकटसमयी लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रस्ताव पाठविला आहे. पुलाची उंची रपट्यासारखी असल्याने पावसाळ्यात मात्र आवागमन बंद राहते. उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांकडून सतत होत असल्याचे नांद्रा येथील सरपंच संदीप लांबट यांनी सांगितले.