शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्टेडियमच्या बांधकामाने मोठे स्वप्न साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 21:29 IST

साडेचार कोटीच्या खर्चातून पूर्णत्वास येत असलेले येथील स्टेडियमचे बांधकाम हे सर्वांत मोठे स्वप्न होते. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय होते. त्यामुळेच जिल्ह्यात इतरांचे तुलनेत याठिकाणी सर्वात जास्त कामे घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : २ आॅक्टोंबरला देवळीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : साडेचार कोटीच्या खर्चातून पूर्णत्वास येत असलेले येथील स्टेडियमचे बांधकाम हे सर्वांत मोठे स्वप्न होते. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय होते. त्यामुळेच जिल्ह्यात इतरांचे तुलनेत याठिकाणी सर्वात जास्त कामे घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.खासदार विकास निधी अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक स्मारक व शहीद अशोक गेडाम स्मृती स्तंभ तसेच शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगर पालिका कनिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्या माळ्याच्या विस्तारीत बांधकाम व मिनी स्टेडियमच्या दुसऱ्या टप्प्याच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. न.प. च्यावतीने साडेतीन कोटीच्या खर्चातून ही कामे हाती घेण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ खा. तडस यांच्या हस्ते झाला.अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेता शोभा तडस, बांधकाम सभापती सारीका लाकडे, शिक्षण सभापती कल्पना ढोक, आरोग्य सभापती सुनिता बकाने, महिला बालकल्याण सभापती सुनिता ताडाम तसेच न.प. सदस्य नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, संध्या कारोटकर, संगीता तराळे, मारोती मरघाडे, अ. नईम आदींची उपस्थिती होती.नगर परिषदेला १५१ वर्ष पूर्ण झाली. न.प. माध्यमिक शाळेला शंभर वर्ष पूर्ण झाली. या दोन्ही बाबी देवळीकरांसाठी गौरवास्पद आहेत त्यामुळे येत्या २ आॅक्टोंबरला महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवात सामाजीक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाºया माजी विद्यार्थ्यांना सन्मान करण्यात येणार आहे, असे खासदार तडस यांनी यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस