शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, पुलाच्या बांधकामामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

ना. गडकरी यांनी वणा नदीच्या खोलीकरणाचे काम लवकरच सुरुच करणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेमडिसिवीर औषधीची निर्मिती होत असल्याने जगात वर्धा जिल्ह्याचे ना. पोहोचले आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होत असल्याने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची ग्वाहीही त्यांनी दिली.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांचे प्रतिपादन : नांदगाव उड्डाणपुलाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोट्यवधींच्या निधीतून रस्ता व पुलांचे बांधकाम झाले आहे. अनेक कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून लवकर कामांना सुरुवातही होणार आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील हिंगणघाट येथील नांदगाव चौरस्त्यावरील ८५.२८ कोटींच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच शेडगाव चौरस्त्यावरील ४७.७८ कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन ना. नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवाजी मार्केट यार्डच्या आवारात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, खा.डॉ. विकास महात्मे, आमदार समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे. आ. डॉ. रामदास आंबटकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरिष गोडे यांची उपस्थिती होती. वणा नदीचे खोलीकरण करणे गरजेचे आहे, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले. त्यावर बोलतना ना. गडकरी यांनी वणा नदीच्या खोलीकरणाचे काम लवकरच सुरुच करणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेमडिसिवीर औषधीची निर्मिती होत असल्याने जगात वर्धा जिल्ह्याचे ना. पोहोचले आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होत असल्याने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच कलोडे भवन चौक व उपजिल्हा रुग्णालय चौकातील उड्डापुलाला मंजुरी देण्याची घोषणाही केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही केल्यात.यावेळी खासदार रामदास तडस यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रेम बसंतानी तर सुत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. उपस्थितांचे आभार नीलेश येवतकर यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान अनेकांनी ना. गडकरी यांचे स्वागतही केलेत.

बाजार समितीच्या कार्याची प्रशंसा- ना. नितीन गडकरी यांनी हिंगणघाट कृषी बाजार समितीच्या कार्याची प्रशंसा करुन बाजार समितीने सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याकरिता शीतगृहाचे बांधकाम करण्याकरिता तसेच बाजार समितीने योगदान दिल्यास हिंगणघाट येथे अद्यावत रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय उभारणे हीे शक्य आहे, असे सांगून याकरिता सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन ना. नितीन गडकरी यांनी दिलेत. 

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी