शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम रखडले

By admin | Updated: July 13, 2017 00:58 IST

वर्धा व अमरावती या दोन्ही जिल्ह्याची सीमा असलेल्या सिरसोली-निंभारणी पुलाच्या बांधकामाचे भिजत धोंगडे गेल्या १९ वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे.

सिरसोलीवासीयांना १९ वर्षांपासून प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : वर्धा व अमरावती या दोन्ही जिल्ह्याची सीमा असलेल्या सिरसोली-निंभारणी पुलाच्या बांधकामाचे भिजत धोंगडे गेल्या १९ वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे. वारंवार मागणी करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वाघ यांनी सामाजिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदर पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन ना. पाटील यांनी दिले. प्रत्यक्ष कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सिरसोली हे गाव आष्टी तालुक्यात तर निंबारनी गाव मोर्शी तालुक्यात येते. ही दोन्ही गावे वर्धा नदीच्या काठावर असल्याने ये-जा करणे अदचणीचे होते. परिणामी प्रवाशांना १६ कि़मी. चे जादा अंतर कापावे लागते. आदर पुलाचे बांधकाम झाल्यास चांदूरबाजार, नेरपिंगळाई, राजूरवाडी, परतवाडा, लेहगाव, आष्टी, कारंजा व नागपूर रस्त्याचे अंतर ३० ते ३५ कि़मीने कमी होईल. या परिसरात नदीवर एकही पूल नाही. त्यामुळे या पुलावरून ५ ते ६ मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरू होऊ शकते. परिसरातील शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळेल. दोन्ही गावांना जाणारी बससेवा सुरू होईल. तसेच गावकऱ्यांना कमी वेळेत ये-जा करता येईल. गेल्या १९ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबीत आहे. आजवर या मागणीची कोणीही दखल घेतली नाही. सिरसोली गाव राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम आले. अशा प्रगतशील गावाला एकही पूल देऊअ नये ही शोकांतिकाच असे मत गावकरी व्यक्त करतात. राज्य शासनाने या गावांना जोडणारा पूल बांधुन दळणवळण सुरळीत करण्याची मागणी आहे.