शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संविधान आणि बौद्ध धम्म हीच भारताची जागतिक ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:58 IST

बुद्धांचा धम्म मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान, सदाचाराची शिकवण देणारा आहे. विज्ञानावार आधारित असलेला बौद्ध धम्म मानवाला जीवन जगण्याची कला शिकवितो. संविधान आणि बौद्ध धम्म हीच भारताची जागतिक ओळख आहे. धम्माशिवाय मानवी कल्याण अशक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : महिलाश्रम मैदानावर बौद्ध धम्म परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुद्धांचा धम्म मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान, सदाचाराची शिकवण देणारा आहे. विज्ञानावार आधारित असलेला बौद्ध धम्म मानवाला जीवन जगण्याची कला शिकवितो. संविधान आणि बौद्ध धम्म हीच भारताची जागतिक ओळख आहे. धम्माशिवाय मानवी कल्याण अशक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले.महिलाआश्रम मैदानावर रविवारी आयोजित ३२ व्या बौद्ध धम्मपरिषदेत ते बोलत होते. विचारमंचावर बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष शांतरक्षित महाथेरो येनाळा, उद्घाटक विदर्भवादी अनिल जवादे, सत्कारमूर्ती डॉ. राजाभाऊ टाकसाळे, सुहास थूल, नीरज गुजर, स्वागताध्यक्ष डी. के. पाटील, अ‍ॅड. शीतल कस्टम, राजेश ढाबरे, प्रजापाल शेंदरे, प्रा. डॉ. राजकुमार शेंडे, आर्वीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विशाल मानकर, अनुपकुमार, अविनाश पाटील, नयन सोनवणे, राजाभाऊ ढाले, डॉ. सुभाष खंडारे, प्रा. शैलेंद्र निकोसे, प्रा. बी. एस. पाटील, माजी शिक्षणाधिकारी धनराज तेलंग, शालीक मेश्राम, धर्मपाल ताकसांडे, गजानन दिघाडे, धम्म परिषदेचे आयोजक भदंत राजरत्न उपस्थित होते.दुपारी बौद्ध धम्माची वास्तविकता, आदर्श आणि आपण या विषयावर आयोजित परिसंवादात राजरत्न आंबेडकर यांनी विचार व्यक्त केले. परिसंवादात मार्गदर्शक म्हणून पुरोगामी विचारवंत सुषमा अंधारे यांनी बुद्ध व्हा शुद्ध व्हा, हा मूलमंत्र दिला. तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी बुद्ध, संत तुकाराम, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर हे एकाच संस्कृतीचे पालक आहेत, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात सकाळी धम्मध्वज ध्वजारोहण, बुद्धवंदनेने करण्यात आली. त्यानंतर डॉ. आंबेडकर विद्यालय, हिंगणघाटच्या विद्यार्थिनींनी स्वागत-अभिवादन गीत व नृत्य सादर केले. सायंकाळी डॉ. भावना ढाबरे यांचा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक भदंत राजरत्न तर संचालन सुनील ढाले यांनी केले. मुकुंद नाखले यांनी आभार मानले. परिषदेत डॉ. राजाभाऊ टाकसाळे, सुहास थूल, नीरज गुजर यांचा सत्कार करण्यात आला. आयोजनासाठी नीरज ताकसांडे, रूपचंद जामगडे, सितम मंदरेले, किशोर कांबळे, तारांचद पाटील, सचिन थूल, बागेश्वर, रेखा सोनवणे, वंदना पाटील, हरिका ढाले, ममता निकोसे, चंद्रकला मानकर, नितीन जुमडे, मंदाकिनी जवादे आदींनी सहकार्य केले.