शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार

By admin | Updated: March 8, 2015 01:44 IST

संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार आहे. ही मुक्तता सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून प्राप्त होणारी आहे; पण ज्यांना आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, असे वाटते ....

वर्धा : संविधान हा माणसाच्या मुक्तीचा विचार आहे. ही मुक्तता सर्व प्रकारच्या गुलामगिरीपासून प्राप्त होणारी आहे; पण ज्यांना आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, असे वाटते आणि इतरांचे अस्तित्वही ज्यांना नकोसे वाटते, तेच या संविधानाचे खरे मारेकरी आहेत, असे प्रतिपादन अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक अ‍ॅड. गणेश हलकारे यांनी केले़ अ.भा. अंनिसच्या जिल्हा व तालुका शाखेद्वारे १९ व्या लोकजागर होलिकोत्सवात अ‍ॅड. हलकारे यांचे ‘संविधानाचे मारेकरी’ विषयावर व्याख्यान आयोजित होते. स्थानिक स्मशानभूमीत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे तर अतिथी म्हणून प्रसिद्ध लेखक, चित्रकार सुनील यावलीकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष वानखेडे, अ.भा. अंनिसचे राज्य सल्लागार संजय इंगळे तिगावकर, जिल्हाध्यक्ष हरिष इथापे, डॉ. सुभाष खंडारे, प्रबोधनकार भाऊ थुटे, सुधीर गिऱ्हे, राजू थूल, माजी अध्यक्ष सुरेश राहाटे, कार्याध्यक्ष प्रा. सुचिता ठाकरे, संघटक पंकज वंजारे उपस्थित होते़ या देशातील प्रत्येक नागरिकाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय, त्यांचे सार्वभौमत्व, व्यक्तिस्वातंत्र्य यासाठी संविधान आहे; पण देशातील वर्णवादी, धर्मांधता, माओवाद, नक्षलवाद साम्राज्यवादी भांडवलशाही स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्यांनाच छेद देत आहे. देशातील या सनातनी मानसिकतेचे बळी चार्वाक, तुकाराम, गांधीपासून दाभोळकर, पानसरेंपर्यंतचे व्यक्तीस्वातंत्र्य जोपासणारे विचारवंत ठरले आहेत. मनूचे संविधान संपुष्टात आणण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे; पण धर्मांध शक्तींना लोकशाही संसद नको तर धर्मसंसद हवी आहे. आम्हीच तेवढे श्रेष्ठ, असे मानणारे कोणत्याही धर्माचे कट्टरवादी असो, हे संविधानाचे मारेकरीच आहेत, असे हलकारे म्हणाले. देशातील लोकशाहीला दुसरा मोठा धोका नक्षलवादी संघटनांचा आहे. त्यांना भारताच्या लोकशाहीवर आधारित संविधान मान्य नाही. या देशाची आर्थिक धोरणे स्वमर्जीनुसार ठरविणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांही संविधानाच्या मारेकरी आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. कल्याणकारी राज्याची संकल्पना टप्प्या-टप्प्याने देशातून बाद झाली़ जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेच्या नावावर देशाचे सार्वभौमत्व संपुष्टात आणण्याचे काम सुरू झाले आहे. अशावेळी संविधानाचे प्राणपणाने रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे. संविधानाच्या मारेकऱ्यांचा पराभव करायचा असेल तर आम्ही मुकी बिचारी जनावरे नसून विचार करणारी माणसे आहोत, या जाणिवेतून एक व्हा, असेही ते म्हणाले.प्रास्ताविक हरिष इथापे यांनी केले. संचालन सचिन घोडे यांनी केले तर आभार सुचिता ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला संजय जवादे, अविनाश हलुले, आकाश जयस्वाल, शुभम जळगावकर, पराग दांडगे, सलील वानखडे, अंकुश कत्रोजवार, राहुल तेलरांधे, गणेश शेंडे व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)