शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानाच्या कुटुंबाचे आमदारांनी केले सांत्वन

By admin | Updated: March 21, 2017 01:19 IST

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफ व माओवाद्यांच्या ११ मार्च रोजी झालेल्या धुमश्चक्रीत सीआरपीएफचे १२ जवान शहीद झाले.

मुलांच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी वर्धा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफ व माओवाद्यांच्या ११ मार्च रोजी झालेल्या धुमश्चक्रीत सीआरपीएफचे १२ जवान शहीद झाले. यात जिल्ह्यातील सोनोरा (ढोक) येथील रहिवासी व नाचणगाव भागात वास्तव्यास राहणारे प्रेमदास मेंढे शहीद झाले. आ. रणजीत कांबळे यांनी सोमवारी शहीद कुटुंबाची भेट घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेले प्रेमदास मेंढे यांना त्यांच्या निवासस्थानी आमदारांनी श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी शहिदाची पत्नी हर्षदाताई, कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मुलगा आर्यन व मुलगी गुंजन या दोघांची आस्थेने चौकशी करीत त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी आ. कांबळे यांनी स्वीकारली. सोबतच शहीद परिवाराला आवश्यक ती मदत देण्याच्या सूचनाही यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. देवळी पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसु, प्रमोद वंजारी, श्यामराव तराळ, बहादूर चौधरी, सुनील बासू, मनीष गंगमवार, आकाश बोंदाडे, विनोद मगर आदी याप्रसंगी उपस्थित होते. शहीद परिवाराची नियमित भेट घेऊन या कुटुबीयांना कोणतीही अडचण येणार नाही या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही आ. कांबळे यांनी दिल्या. कुटुंबापासून दूर राहून देशाच्या संरक्षणाकरिता लढणाऱ्या वीर जवानांचे उपकार मोठे आहेत. वेळप्रसंगी हौतात्म्य पत्करणाऱ्या या जवानांचा सार्थ अभिमानच आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे. त्या कुटुंबीयांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार असल्याचेही यावेळी आ. रणजीत कांबळे यांनी सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)