शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी समर्थनार्थ काँग्रेसचे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासन, केंद्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तसेच शेतकºयांच्या संघटनेशी बोलणीे करायला तयार नाही, म्हणून वर्धा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते रामभाऊ सातव यांच्या नेतृत्वात नागपूर-यवतमाळ या महामार्गावरील दत्तपूर शिवारात निषेध आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चक्क दोन तास सरकारविरोधी घोषणाबाजी केली.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन ...

ठळक मुद्देदत्तपूर बायपास वर दोन तास केली घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासन, केंद्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. तसेच शेतकºयांच्या संघटनेशी बोलणीे करायला तयार नाही, म्हणून वर्धा येथे कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते रामभाऊ सातव यांच्या नेतृत्वात नागपूर-यवतमाळ या महामार्गावरील दत्तपूर शिवारात निषेध आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चक्क दोन तास सरकारविरोधी घोषणाबाजी केली.शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन सरकारचे लक्ष्य शेतकऱ्यांच्या मागण्याकडे वेधण्यासाठी दोन तास आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना रामभाऊ सातव म्हणाले की, भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासन दिली होती. मात्र त्याची पूर्तता झाली नाही असे त्यांनी सांगितले. आंदोलनात अंकुश पिंपरे, गंगाधर पाटील, सुधाकर मेहरे, भक्तराज अलोणे, नरेंद्र गुजर, प्रल्हाद गिरीपुंजे, सुभाष देशमुख, राजेंद्र गवळी, रमेश खेडकर, सुधाकर घाडगे, सुरेश बोरकर, ज्ञानेश्वर वैद्य, राजकुमार बारी, रमेश गुरनुले आदी सहभागी झाले होते.या आहेत मागण्याशेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतकऱ्यांना मोफत पीक विम्याचे कवच देण्यात यावे, शेतीला पुरक व्यवसायासाठी अनुदान देण्यात यावे, महागाई नियंत्रणात आणण्यात यावी, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांना नियंत्रणात आणण्यात यावे, बोंडअळी, गारपीट आदीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावी, शेतकºयांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना पाठविले.