शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदी विरोधात काँग्रेसजन रस्त्यावर

By admin | Updated: January 7, 2017 00:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप करीत

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत निघाला मोर्चा वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटबंदीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचताच एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना घेराव घालून निवेदन सादर केले. मोर्चाच्या माध्यमातून नोटाबंदीच्या दुष्परिणामाचा निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात कॉग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, आ. रणजित कांबळे, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, शहराध्यक्ष राजेश शर्मा, महासचिव प्रवीण हिवरे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. तत्पूर्वी प्रदीप मंगल कार्यालयात सभा पार पडली. या सभेला प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण, आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह चारूलता टोकस यांनी मार्गदर्शन केले. नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर हा मोर्चा नियोजित मार्गे रवाना झाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक वर्धा : सामान्य रुग्णालयापासून निघालेला हा मोर्चा इतवारा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. या मोर्चात सहभागी नागरिकांच्या हाती असलेले फलक व त्यावरील घोषवाक्य आकर्षक ठरले. येथे चारूलता टोकस व आ. कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला. हा मोर्चा पं.स. कार्यालयाजवळ पोहोचताच पोलिसांच्यावतीने मोर्चा येथे रोखण्यात आला. त्यानंतर मोर्चेकरांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता रवाना झाले. सदर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शैलश नवाल यांना निवेदन देऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. या शिष्टमंडळाच्यावतीने नोटबंदीमुळे निर्माण झालेली स्थिती व सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतमालाला मिळत असलेले दर, शेतकऱ्यांकडून कर्जाची अव्वाच्या सव्वा दराने होत होत असलेली वसुली, यामुळे होत असलेल्या आत्महत्यांवरही चर्चा करण्यात आली. भाजीपाला वर्गीय शेतमालाचे दर पडल्याने शेतकरी ते फुकटात वाटत आहेत. काही ठिकाणी ते रस्त्यावर टाकत असून याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या सर्व प्रकाराची माहिती वरिष्ठांकडे पोहोचविण्याकरिता हे निवेदन देण्यात येत असून ते वरिष्ठांना पाठविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या मोर्चात जिपचे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, ज्ञानेश्वर ढगे, माजी सभापती मनोज वसू, वर्धा कृउबाचे उपसभापती पांडुरंग देशमुख, सभासद पुरुषोत्तम टोनपे, माजी नगराध्यक्ष आकाश शेंडे, प्रकाश डफ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)