शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

दोन जागी भाजप तर एकावर काँग्रेसला कौल

By admin | Updated: February 24, 2017 02:13 IST

जि.प., पं.स. निवडणुकीच्या निकालांनी सर्वांना धक्काच दिला. काँग्रेसचा हिरमोड झाला तर भाजपाला दोन जागा मिळाल्या.

पंचायत समितीवर भाजपाचाच पगडाआष्टी (श.) : जि.प., पं.स. निवडणुकीच्या निकालांनी सर्वांना धक्काच दिला. काँग्रेसचा हिरमोड झाला तर भाजपाला दोन जागा मिळाल्या. काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. पं.स.वर ६ पैकी ४ जागांवर भाजप तर दोन जागांवर काँगे्रस विजयी झाली. गत ३५ वर्षांपासून सतत निवडून येणारे रमेश वरकड यांना अवघ्या ८५ मतांनी पराभव पत्करावा लागला. गड आला; पण सिंह गेला, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.साहुर जि.प. गटात भाजपाच्या छाया घोडीले यांनी काँग्रेसच्या अर्चना घोरपडे यांना ६६३ मतांनी पराभूत केले. बसपाच्या वंदना दंडाळे यांना ६७९ मते मिळाली. त्या नसत्या तर चित्र बदलले असते. चुरशीच्या लढतीत भाजपला विजय मिळाला. लहानआर्वी गटात काँग्रेसचे त्रिलोकचंद कोहळे यांनी भाजपाचे कमलाकर निंभोरकर यांना ७७७ मतांनी पराभूत केले. राष्ट्रवादीचे राजेश ठाकरे यांना २१९१ मते मिळाली. भाजपाचे निंभोरकर दहाव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. भाजप बंडखोर राजेश ठाकरे राष्ट्रवादीकडून लढले. ही भाजपच्या पराभवाची बाब ठरली. याकडे सर्वांचे लक्ष होते. तळेगाव जि.प. गटात भाजपच्या अंकीता होले यांनी काँग्रेसच्या सुनीता इंगळे यांना ४३० मतांनी पराभूत केले. येथे काँग्रेस विजयी होणार, असा सूर होता; पण ‘लोकमत’ने वर्तविलेला अंदाज खरा ठरला. लहानआर्वी पं.स. गणात भाजपाच्या निता होले, अंतोरा गणात भाजपच्या रेखा योगेंद्र मतले विजयी झाल्या. मतले अवघ्या १४ मतांनी विजयी झाल्या. येथे जि.प. काँग्रेस तर दोन्ही पं.स. गण भाजपला गेल्या. साहुर पं.स. गणात काँगे्रसचे इश्वर वरकड विजयी झाले. त्यांनी ३५ वर्षांपासून सतत निवडून येणारे भाजपचे रमेश वरकड यांना ८५ मतांनी पराभूत केले. माणिकवाडा गणात भाजपाचे गोविंदा खंडाळे, भारसवाडा गणात काँग्रेसचे राजेंद्र चौधरी विजयी झाले. बंडखोर अजय लोखंडेमुळे येथे काँग्रेसचा विजय झाला. तळेगाव पं.स. गणात चौरंगी लढत झाली. यात भाजपच्या हेमलता भगत विजयी झाल्या. मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सीमा गजभिये, नायब तहसीलदार मृदुलता मोरे, गणेश सोनवणे यांनी यशस्वी पार पाडली. ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी बंदोबस्त ठेवला.(तालुका प्रतिनिधी)