शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर काँगे्रसला राजकीय हादरे

By admin | Updated: January 25, 2017 00:56 IST

जि.प., पं.स. निवडणुकीची रंगत दिवसागणिक वाढत आहे. राजकीय पक्षांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेताना

दोन माजी सभापती भाजपात : नागपुरात केला पक्ष प्रवेश वर्धा : जि.प., पं.स. निवडणुकीची रंगत दिवसागणिक वाढत आहे. राजकीय पक्षांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेताना मुलाखती आटोपल्या जात असतानाच पक्षांतर करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जि.प. च्या माजी शिक्षण सभापती व विद्यमान सदस्य उषाकिरण थुटे, एकेकाळचे काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण उरकांदे, जि.प. च्या माजी महिला बालकल्याण सभापती मेघा उरकांदे यांनी भाजपाची वाट धरली आहे. तीनही स्थानिक बड्या नेत्यांचे अधिकृत प्रवेश झाल्याने काँग्रेसला राजकीय हादरे बसले आहेत. नगर परिषदेच्या निवडणुका असताना अनेक काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षांना रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरही तेच घडत आहे. काँगे्रसकडून उमेदवारी नाकारली जाण्याच्या तसेच विजयाची खात्री नसल्याच्या धास्तीने पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. समुद्रपूर येथून जिल्हा परिषद सदस्यपद काबीज करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या प्रा. उषाकिरण थुटे यांनी काँगे्रसला दूर सारून भाजपाला जवळ केले आहे. थुटे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या सोबतच काँगे्रसचे माजी नगरसेवक राजू अवचट, मनसेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रागिनी शेंडे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तत्पूर्वी, आ. रणजीत कांबळे यांच्या गोटाचे व त्यांच्या पुढाकारामुळे काँगे्रसचे जिल्हाध्यक्षपद मिळालेले प्रा. किरण उरकांदे यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांनीही भाजपाची वाट धरली असून अधिकृत प्रवेश केला. शिवाय त्यांच्या पत्नी व काँगे्रसच्या माजी महिला व बालकल्याण सभापती राहिलेल्या मेघा उरकांदे यादेखील भाजपावासी झाल्या आहे. निवडणुकीच्या तोंडावर असताना त्या-त्या क्षेत्रात वजन असलेल्या तीन बड्या स्थानिक नेत्यांनी पक्ष सोडल्याने काँगे्रसला हादरा बसला आहे. प्रा. किरण उरकांदे या तळेगाव (टा.) जि.प. गटासाठी भाजपची उमेदवारी मागत आहे. यामुळे पक्षाकडे आशा ठेवून असलेले तळेगाव (टा.)गटात भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आशेवर उरकांदे यांच्या पक्षप्रवेशाने पाणी फेरले जाते काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.जिल्ह्यात पक्षांतर करणाऱ्यांमध्ये मोठ्या नावांचाच समावेश होत असल्याने काँगे्रसच्या खेम्यातील चिंता मात्र वाढताना दिसत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)