शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राफेलप्रकरणी काँग्रेसने दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 20:22 IST

राफेल विमान खरेदी हा देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. या विमान खरेदी गैरव्यवहाराच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.

ठळक मुद्देचारूलता टोकस यांचे नेतृत्व : चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती गठित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राफेल विमान खरेदी हा देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा आहे. या विमान खरेदी गैरव्यवहाराच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.राफेल खरेदी महाघोटाळ्यामुळे देशाच्या सरकारी तिजोरीला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सरकारी कंपनी हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक्स लिमिटेडकडे डोळेझाक करून भांडवलदारांना लाभ मिळवून देण्याचा हा प्रकार असून चौकशीसाठी समिती गठित करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये राफेलच्या किमतीमुळे सरकारी तिजोरीचे ४१.२०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. काँग्रेसच्या काळात १२६ विमान ५२६.१० कोटी याप्रमाणे व्यवहार ठरला होता. भाजप सरकारने हा व्यवहार ३६ विमानांसाठी करून १६७०.७० कोटी रुपयांनी विमान खरेदी केले. अशाप्रकारे ४१.२०५ कोटी रुपयांचा चुना सरकारी तिजोरीला लावला. हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक्स लिमिटेड या पब्लिक सेक्टरमधील कंपनीकडून ३० हजार कोटी रूपयांचे आॅफसेट कॉन्ट्रक्ट आपले भांडवलदार मित्र अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला दिले. पंतप्रधान मोदी यांनी कायदे मंत्रालयाची परवानगी नसतानाही ही अट काढून घेतली. आदी महत्त्वाचे मुद्दे विचारात घेण्यासाठी काँग्रेस पक्षाने संयुक्त चौकशी समितीची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, हेमलता मेघे, इंद्रकुमार सराफ, मोरेश्वर खोडके, धैर्र्यशील जगताप, शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ, श्याम देशमुख, बाळा जगताप, बाबा अब्दुल जलील, इरफान बेग, मोहम्मद इजाज, जावेद खान, शादीक शेख, नवाज लाभा साहाब, विजय जयस्वाल, पांडुरंग देशमुख, धर्मपाल ताकसांडे, डेहणे पाटील, पंढरी कापसे, लक्ष्मणराव कांबळे, प्रवीण उपासे, हातीम शेख, विपीन राऊत, अमित गावंडे, अर्चना टोणपे, मनोज चौधरी, रंजना पवार, अनिता श्रीवास्तव, अरुणा धोटे, नरेंद्र सावरकर, मुकुंदा कामडी, अर्चना मून, मंजूषा देशमुख, कुंदा भोयर, सुवर्णा भोयर, रोशन जावळेकर, प्रभाकर थोटे, कमलाकर पिंपळे, राजेश राजूरकर, मिलिंद मोहोड, बाबाराव निवल, राजू राजुकरकर, चंदु सुटे, नंदू कांबळे, सुकेशनी धनविज उपस्थित होते.