लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँगे्रस कमिटीच्या अध्यक्ष अॅड. चारूलता टोकस यांनी केले.भाजपाचे केंद्र व राज्यातील सरकारच्या चुकीच्या कारभाराविरूद्ध जिल्हा काँगे्रस कमिटीद्वारे महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना भाजपा सरकार मदत करीत आहे. आजपर्यंत भिडे यांना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे देशात अराजकता निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला. देशात जातीयवाद पसरविण्याचे प्रयत्न सत्तारूढ भाजप करीत असताना काँगे्रस पक्षाने त्याविरूद्ध आवाज उठविण्याचे काम हाती घेतले. यासाठी देशव्यापी एकदिवसीय उपोषण केल्याचे कोल्हे सांनी सांगितले. उपोषणात प्रदेश काँगे्रस कमिटीचे सचिव शेखर शेंडे, जि.प. चे माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव, महिला काँगे्रस जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, विपीन राऊत, सुनील बासू, लक्ष्मण कांबळे, अमित गावंडे, जि.प. गटनेते संजय शिंदे, सदस्य चंद्रकांत ठक्कर, विवेक हळदे, मलघाम, प्रमोद लाडे, उज्ज्वला देशमुख, मनीष साहु, बाळा माऊस्कर, धर्मपाल ताकसांडे, मकरंद टोणपे, गजू खोंड, मनोहर खडसे, राजेंद्र शर्मा, इक्राम हुसेन, अविनाश काकडे यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.मोदींचे मुखवटे घालून चॉकलेट वाटपपंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार वर्षांपासून जनतेला चॉकलेट देत असून शेतकरी, कष्टकऱ्यांची एकही मागणी पूर्ण करीत नाही. शिवाय महागाईवरही नियंत्रण नसल्याने मोदी यांचा मुखवटा घालून चॉकलेटचे वितरणही करण्यात आले. या कृतीतून काँगे्रस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र तथा राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध नोंदविला.अन् ओसरली गर्दीकाँगे्रसच्यावतीने सामाजिक समता, बंधुत्व व शांततेसाठी एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. विरोधी पक्ष असल्याने या आंदोलनात लक्षणीय गर्दी अपेक्षित होती; पण सकाळी ती केवळ काही वेळापूरतीच दिसून आली. यानंतर हळू-हळू गर्दी ओसरत असल्याचे पाहावयाास मिळाले. आमदारांसह काही महत्त्वाचे पदाधिकारीही या उपोषण मंडपापासून फारकत घेऊन असल्याचेच दिसून आले.
देशात समता, शांतता राखण्याचे काम काँगे्रसच करू शकते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:39 IST
देशात सध्या सांप्रदायिक भेदभावाचे वातावरण आहे. त्यातून समाजाला वाचविण्याचे काम केवळ काँगे्रस विचारसरणीमध्येच आहे. सामाजिक समता, बंधुत्व व शांतता राखण्याकरिता काँगे्रसशिवाय पर्याय नाही. देशात जातीयवादी पक्षाची सत्ता आहे, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँगे्रस कमिटीच्या अध्यक्ष अॅड. चारूलता टोकस यांनी केले.
देशात समता, शांतता राखण्याचे काम काँगे्रसच करू शकते
ठळक मुद्देचारूलता टोकस : जिल्हा काँगे्रस कमिटीचे एकदिवसीय उपोषण