शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावात काँग्रेसने रोखला नागपूर-अमरावती महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST

केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या हत्याकांडाला केंद्रात सत्ता असलेले भारतीय जनता पक्षाचे दुर्लक्षित धोरण जबाबदार असून, प्रियांका गांधी यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली. याच घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव अमर काळे यांच्या नेतृत्त्वात तळेगाव (श्या.पंत.) येथे नागपूर-अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन करण्यात आले.केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. आंदोलनात नितीन दर्यापूरकर, पंकज वाघमारे, जितेंद्र शेटे, विशाल साबळे, त्रिलोकचंद कोहळे, सुधीर वाकुडकर, प्रतीक मुळे, तुकाराम घागरे, अमोल सुरवाडे, मुकेश कराळे, बाबाराव अवथळे, गोपाल मरस्कोल्हे, राजू चाैधरी, दिलीप राठी, ज्ञानेश्वर जमालपुरे, राहुल लाड, राहुल देशमुख, शशी कांबळी, सुरेंद्र गायकवाड, नागो खोडे, अंकुश चव्हान, सागर कळसकर, नंदू खारकर, मनिष शेकार, जमील खाँ पठान, मधुसुदन नागपुरे, राजू मोहता, किशोर खाजबागे, राजेश करोले, गोविंदा बुले,  शकील बेग, रवींद्र कोहळे, पुरुषोत्तम ठाकरे, प्रशांत मुडे, केशव बानाईत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वाहतुकीला लागला ब्रेक- प्रियांका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ तळेगाव (श्या.पंत.) येथे नागपूर-अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे नागपूरकडून अमरावती, तर अमरावतीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक तब्बल एक तासांसाठी ठप्प झाली होती. एकूणच या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामcongressकाँग्रेस