शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

15 वर्षे वयोगटातील मुला-मुलीत लसीबाबत संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

शिक्षण  आणि आरोग्य विभागाने काही बाबी स्पष्ट केल्या नसल्याची  शिक्षण क्षेत्रात ओरड आहे.  मेंदूज्वर लसीकरण आणि कोविड लसीकरण हे एकाचवेळी आले आहे; मात्र पहिली कोणती लस घ्यावी यात संभ्रमावस्था कुमार-कुमारिकेमध्ये निर्माण झाली आहे. एकाच वेळेस दोन लसी घ्यायच्या की काही ठराविक दिवसांनंतर घ्यायची हे न उलगडणारे कोडे आता विद्यार्थ्यासमोर निर्माण झाले आहे.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : शासन निर्देश आणि आरोग्य विभागाच्या  सूचनेनुसार  जिल्ह्यात शाळेत मेंदूज्वर लसीकरण सुरू झाले आहे. तर याच दरम्यान  शासकीय रुग्णालयात १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी केंद्र सरकारचे  कोविड लसीकरणही सुरू आहे; मात्र यातील १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यात  शंकाकुशंका निर्माण झाली असल्याने लस घ्यावी ? की नाही? हा संभ्रम आहे. शिक्षण  आणि आरोग्य विभागाने काही बाबी स्पष्ट केल्या नसल्याची  शिक्षण क्षेत्रात ओरड आहे.  मेंदूज्वर लसीकरण आणि कोविड लसीकरण हे एकाचवेळी आले आहे; मात्र पहिली कोणती लस घ्यावी यात संभ्रमावस्था कुमार-कुमारिकेमध्ये निर्माण झाली आहे. एकाच वेळेस दोन लसी घ्यायच्या की काही ठराविक दिवसांनंतर घ्यायची हे न उलगडणारे कोडे आता विद्यार्थ्यासमोर निर्माण झाले आहे.

जापनीज एजेफेलिया  लसीकरण १ ते १५ वयोगटासाठी शाळेत शिक्षणाधिकारी व आरोग्य विभाग यांच्या आदेशाने सुरू आहे आणि १५ ते १८ वयोगटासाठी  कोविड लसीकरणही शासकीय रुग्णालयात सुरू आहे ते  करणेही गरजेचे आहे. त्यासाठी याच महिन्यातील कालावधी ३ ते १५ पर्यंत दिला आहे. पंधरा वर्षे वयोगटातील कुमार आणि कुमारिका हे आठव्या-नवव्या वर्गातील आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दोनपैकी कोणती लस पहिली घ्यावी? त्याचे महत्त्व काय! याबाबत काहीच स्पष्ट केले नसल्याने सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत आहेत याबाबत शिक्षण विभागाने निर्देश देणे जरुरीचे आहे.-  सतीश जगताप, जिल्हाध्यक्ष ,मुख्याध्यापक संघ.

विद्यार्थी काय म्हणतात...

मेंदूज्वर लसीकरण आणि कोरोना लस हे एकाचवेळी आलेले आहे. मात्र पहिले कोणते लसीकरण करावे, यात आता आमची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.- कोमल मडामे, इयत्ता नववी.

मेंदूज्वरची लस देणे सर्व शाळेत सुरू आहे आणि सध्या कोरोनाची स्थिती पाहता, कोविड १९ लस घेणे आवश्यक आहे. दोन्ही लसीकरणात किती दिवसाचे अंतर असावे, हे स्पष्ट केले नाही- रोशन किसन पवार, इयत्ता आठवी.

कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता, १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना लस घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे आणि शाळेतही शासनाच्या निर्देशाप्रमाणे जापानीज लसीकरण सुरू आहे; पण या लसी दोन्ही एकाचवेळी घ्यायच्या की कसे? त्यामुळे विपरित परिणाम होईल का? यासंदर्भात कोणी काहीही सांगितले नाही- खुशी सोळंके, इयत्ता नववी.

एकाचवेळी दोन्ही लसी कशा घ्याव्यात? अशी साहजिकच विद्यार्थ्यांना भीती वाटते! ती भीती रास्तही आहे, त्यामुळे एक लस घेतल्यावर अंदाजे आठ दिवसानंतर एक आठवड्यानंतर दुसरी लस घेता येते. आणि पहिली लस कोणती घ्यावी ? मेंदूज्वर की कोविडची  ?अशी संभ्रमावस्था विद्यार्थ्यात आहे; परंतु कोणतीही लस पहिली घेतली तर काहीच फरक पडत नाही आणि घाबरायचे कारण नाही. दोनपैकी कोणतीही लस प्रथम  घेऊ शकता असे काही बंधन नाही.- डॉ. मोहन सुटे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या