शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बोर व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांना सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:26 IST

बोर व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीत विशेष सवलत देण्यात आली आहे. यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ५० तर जिल्ह्याबाहेरील विद्याार्थ्यांसाठी २५ टक्के सवलत देण्यात आली आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील ७५, जिल्ह्यातील ५० तर जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना २५ टक्के सुट

रितेश वालदे।आॅनलाईन लोकमतबोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीत विशेष सवलत देण्यात आली आहे. यात तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ५० तर जिल्ह्याबाहेरील विद्याार्थ्यांसाठी २५ टक्के सवलत देण्यात आली आहे.जंगल सफारीसाठी सकाळी ६ ते १२ व दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत आत सोडण्यात येते. सोमवारी जंगल सफारी बंद ठेवण्यात येते. जंगल सफारीसाठी बोरधरण गेटवर २० जिप्सी तर अडगाव गेटवर २० जिप्सी उपलब्ध आहेत. दोन्ही गेटवरून सकाळी २० व दुपारी २० जिप्सी सोडण्यात येतात. बोर व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी बोरमध्ये २६ व अडेगावमध्ये १५ गाईड उपलब्ध करून देण्यात आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला येताना विद्यार्थ्यांनी वा शिक्षकांनी मुख्याध्यापकाचे पत्र व विद्यार्थ्यांची यादी आणणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील बोरधरण येथून जंगल सफारीचा आनंद घेता येतो. या दोन्ही ठिकाणाहून आॅनलाइन बुकींग सुविधा आहे. बोर व्याघ्र प्रकल्प १५ हजार ८१२.३२ हेक्टर (१३८.१२ चौरस किमी) मध्ये पसरला आहे. यात बोर व न्यू बोर, असे दोन भाग असून वर्धा व नागपूर जिल्ह्यात त्याची सिमा आहे. या दोन भागात जंगल सफारीसाठी ४७ किमी क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत आकाराने लहान म्हणून बोरची ओळख आहे. असे असले तरी येथील जैवविविधता, वन्य प्राण्यांचा अधिवास पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाची सफारी करताना येथील निसर्ग संपदा, पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल, रानडुकर, नीलगाय, सांबर, चित्तर, भेडकी, रानकुत्री, खवले मांजर आदी वनप्राण्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळतो. यामुळे बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांची पहिली पसंत ठरत आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा ही दोन अभयारण्ये जोडण्याची किमया बोरने साधली आहे. यामुळे बोरला महत्त्व प्राप्त झाले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात सागवान, तेंदु, बेहडा, धावडा, टेंभुर्णी, तिवस, मोहन, आडन, अचारलेडी आदी वनसंपदा आहे. जैवविविधतेने नटलेल्या या जंगलामध्ये झुडपी वेलवर्गीय प्रजातीचीही विविधता आढळून येते.वनसंपदा व प्राण्यांमुळे विशेष आकर्षणराज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्याने तथा अभयारण्ये आहेत. विदर्भात प्रामुख्याने मेळघाट, ताडोबा, पेंच, अंधारी, नवेगाव आणि कहाड (उमरेड) आदी व्याघ्र प्रकल्प आहेत. या अभयारण्याला भेटी देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असताना वाघाच्या अधिवासासाठी बोर व्याघ्र प्रकल्प ही नवी ओळख ठरत आहे. आकाराने लहान असले तरी येथील जैवविविधतेने नटलेल्या जंगलाला विशेष महत्त्व आले आहे.