शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सेवा पूर्व परीक्षेला सक्तीच्या संचारबंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

वर्धा शहरातील महादेवपुरा भागातील न्यू इंग्लिश हायस्कूल, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, सिव्हील लाईन भागातील गो. से. वाणिज्य महाविद्यालय, नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळा, सेवाग्राम मार्गावरील यशवंत महाविद्यालय, पिपरी (मेघे) भागातील अग्रग्रामी हायस्कूल, तर सेवाग्राम मार्गावरील सुशील हिम्मतसिंगका विद्यालय या परीक्षा केंद्रांवर एकूण १ हजार ९४४ परीक्षार्थ्यांना राज्य सेवा पूर्ण परीक्षा देण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सात केंद्रांवरून घेण्यात आली परीक्षा : प्रथम सत्राच्या पेपरला ६५४, तर द्वितीयला ६६० परीक्षार्थ्यांची गैरहजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात  ‘विक एन्ड लॉकडाऊन’ लागू केला आहे. याच संचारबंदीच्या काळात म्हणजे रविवारी (दि.२१) जिल्ह्यातील सात केंद्रांवरून राज्य सेवा पूर्व परीक्षा शांततेत पार पडली. असे असले तरी १ हजार ९४४ परीक्षार्थ्यांपैकी प्रथम सत्राच्या पेपरला ६५४, तर द्वितीयला ६६० परीक्षार्थी गैरहजर होते. तशी नोंद जिल्हा प्रशासनाने घेत त्याबाबतची माहिती आयोगाला पाठविली आहे.वर्धा शहरातील महादेवपुरा भागातील न्यू इंग्लिश हायस्कूल, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, सिव्हील लाईन भागातील गो. से. वाणिज्य महाविद्यालय, नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळा, सेवाग्राम मार्गावरील यशवंत महाविद्यालय, पिपरी (मेघे) भागातील अग्रग्रामी हायस्कूल, तर सेवाग्राम मार्गावरील सुशील हिम्मतसिंगका विद्यालय या परीक्षा केंद्रांवर एकूण १ हजार ९४४ परीक्षार्थ्यांना राज्य सेवा पूर्ण परीक्षा देण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत प्रथम सत्राचा पेपर पार पडला. १ हजार ९४४ परीक्षार्थ्यांपैकी १ हजार २९० परीक्षार्थ्यांनी हा पेपर सोडविला, तर द्वितीय सत्राचा पेपर दुपारी तीन ते पाच या वेळेत याच सात केंद्रांवरून घेण्यात आला. यावेळी तब्बल ६६० परीक्षार्थी गैरहजर होते. 

आरडीसींनी केली पाहणीरविवारी जिल्ह्यातील सात केंद्रांवरून राज्य सेवा पूर्व परीक्षा शांततेत पार पडली. ही परीक्षा सुरू असतानाच निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी परीक्षा केंद्रांवर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. 

परीक्षा देणाऱ्यांत दोन कोविड बाधित व्यक्तींचा समावेशकोविड बाधित परीक्षार्थ्यांनाही राज्य सेवा पूर्ण परीक्षा देता येईल असे जाहीर करण्यात आले होते. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून रविवारी सुशील हिम्मतसिंगका या केंद्रावरून दोन कोविड बाधितांनी राज्य सेवा पूर्ण परीक्षा दिली. या कोविड बाधितांना परीक्षा देण्यासाठी केंद्रावर विशिष्ट आणि वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.

प्रत्येकाच्या शरीराचे तपासले तापमानपरीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रांवर आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान सुरुवातीला तपासण्यात आले. त्यानंतर सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत त्यांना बसवून परीक्षेचा पेपर देण्यात आला. एकूणच कोरोना संदर्भातील सर्वच खबरदारीच्या उपाय योजनांचे पालन सातही परीक्षा केंद्रांवर करण्यात आले.

पोलिसांचा होता चोख बंदोबस्तराज्य सेवा पूर्व परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातही परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक केंद्रावर पोलीस ठाण्यामधील दोन, तर पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी, तर सातही केंद्रांसाठी एक पोलीस अधिकाऱ्याने सेवा दिली.

रविवारी जिल्ह्यात संचारबंदी लागू असली तरी सात केंद्रांवरून राज्य सेवा पूर्व परीक्षा शांततेत पार पडली. दोन कोविड बाधितांनी रविवारी सुशील हिम्मतसिंगता या केंद्रावरून परीक्षा दिली. या काेविड बाधितांना बसण्यासाठी विशिष्ट आणि वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा