शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:12 IST

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सोमवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वर्धा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देगॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध : मोर्चा काढून सरकार विरोधी घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सोमवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला वर्धा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वर्धा शहरात काँग्रेस, राकाँ व सदर मुद्द्यांवर एकत्र आलेल्या समविचारी पक्षांनी स्थानिक बजाज चौक ते अंबिका चौक पर्यंत मोर्चा काढून सरकार विरोधी घोषणाबाजी केली.स्थानिक बजाज चौक येथून काढण्यात आलेल्या सदर निषेध मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबाबत सरकारने तात्काळ योग्य पाऊल उचलून उपाय योजना कराव्या. केंद्र व राज्य सरकारने जनसामान्य विरोधी धोरण न अवलंबता सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून लोकहितार्थ धोरणाचा अवलंब करावा, आदी मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी रेटून लावल्या होत्या. सदर निषेध मोर्चाचे नेतृत्त्व काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, काँगेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे, राकाँचे माजी आमदार सुरेश देशमुख आदींनी केले.या निषेध मोर्चात कॉँग्रेसचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष सुनील कोल्हे, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा हेमलता मेघे, काँग्रेसचे जेष्ठ नेते रामभाऊ सातव, प्रविण हिवरे, राजेंद्र शर्मा, जि.प. चे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, इक्राम हूसेन, निलेश खोंड, आयटकचे अस्लम पठाण, रवी शेंडे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढ विषयी एकत्र आलेल्या समविचारी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.व्यापाऱ्यांनी फिरविली पाठपुकारण्यात आलेल्या बंदला वर्धा शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नंदी पोळा व पुढे गणपती उत्सव असल्याने अनेक व्यापाºयांनी सोमवारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे टाळल्याचे बाजारपेठेचा फेरफटका मारल्यावर दिसून आले. असे असले तरी वर्धा शहरातील काही व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध केला हे उल्लेखनिय.मोदी सरकारने गोर गरीबांचे कंबरडे मोडले आहे. अच्छे दिनाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने समाजाच्या सर्वच घटकांचा विश्वासघात केला आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ भाववाढीने गोरगरीबांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे या सरकारने सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. या सरकारने राजीनामा देऊन नव्याने जनादेश घ्यावा. युवकांमध्येही या सरकारबाबत नैराश्य निर्माण झाले आहे. या सरकारविरुद्ध चले जाव चळवळी प्रमाणे आंदोलन उभारण्याची गरज आहे.- सुधीर कोठारी, राकाँचे जेष्ठ नेते तथा सभापती, कृ.उ.बा.स. हिंगणघाट.राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. या निर्णयाचे समाजातील विविध स्तरातून स्वागत होत असले तरी चोर वाटेने तेथे दारू येऊन विक्री होत आहे. परिणामी, मोठा महसूल बुडत आहे. दारूबंदीच्या निर्णयानंतर शासकीय तिजोरीतील महसूल तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने पेट्रोल व डिझेलवर याचा अतिरिक्त भार टाकला. त्यामुळे पेट्रोल व डिझेल अधीक महागले आहे.- रणजित कांबळे, आमदार.भाजपाने निवडणुकीच्यावेळी नागरिकांना विविध आश्वासने दिली होती. परंतु, ही आश्वासने पूर्ण करण्याकडे सध्याचे सरकार दुर्लक्षच करीत आहे. केंद्र व राज्य सरकार नाकाम ठरले आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्यांच्या अडचणीत भर टाकणारीच आहे.- चारूलता टोकस, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस.मागील साडेचार वर्षांपासून केंद्र व राज्यातील भाजपा सरकार नागरिकांच्या अडचणीत भरच टाकत आहे. या सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी अजूनही सुमारे सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत भाजपा सरकारने त्यांचे धोरण बदलविले नाही तर त्यांना जनता धडाच शिकवेल.- शेखर शेंडे, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.