महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह सेवाग्राम व पवनारचा कायापालट करण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या सेवाग्राम विकास आराखड्याच्या तीन टप्प्यातील कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या ही कामे ४० टक्के पूर्ण झाली असून २ आॅक्टोबरपर्यंत सदर कामे ४५ टक्के पूर्ण करीत प्रत्यक्ष कार्यातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा आहे.सेवाग्राम विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देताच प्रत्यक्ष सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात पवनार येथील धाम नदी पात्र सौंदर्यीकरण, सभागृहाचे बांधकाम, पाण्याची टाकी, वाहनतळ ही कामे हाती घेण्यात आली. तर याच कामांसोबतच दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली आहे. सेवाग्राम विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामे ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. सध्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामे ४० टक्के पूर्ण झाली आहे. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून सरकारने हाती घेतलेल्या व राज्य सरकारसाठी महत्त्वाकांशी असलेल्या सेवाग्राम विकास आराखड्याचे काम ४५ टक्के पूर्ण करीत प्रत्यक्ष कामातून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी बापूंना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.‘सेल्फी पॉर्इंट’ घालणार अनेकांना भुरळसेवाग्राम विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या सेवाग्राम भागातील सभागृहाचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. हे सभागृह सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानकडे वळते केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या सभागृहाला गांधी विचारांचा ऐतिहासीक जोड देण्यासाठी येथे जगातील सर्वात मोठा चरखा उभारल्या जात आहे. सदर चरखा उभारून त्या परिसराचे सौंदर्यीकरणे करण्यात येणार आहे. २ आॅक्टोबरपर्यंत ७० टक्के काम पूर्ण होणार असून हा परिसर पर्यटकांना भुरळच घालणार आहे. पर्यटकही या ठिकाणी आल्यावर एक सेल्फी घेण्याचा मोह आवरू शकणार नाही.देखरेख होतेय मुंबईच्या नामवंत कंपनीकडूनसेवाग्राम विकास आराखड्याच्या कामांचा कंत्राट खासगी कंत्राटदाला देण्यात आला असला तरी त्या कंत्राटदाराकडून गुणवत्तापूर्वक काम करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहेत.इतकेच नव्हे तर राज्यातील नामवंतापैकी एक असलेल्या मुंबई येथील अडारकर असोसीएटकडे सदर बांधकामाच्या देखरेखेची जबाबदारी देण्यात आली आहे. या कंपनीचे सुमारे चार तज्ज्ञ सध्या वर्धेत सेवा देत असल्याचे सांगण्यात आले.आतापर्यंत तोडले नाही एकही वृक्षसेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत होत असलेल्या तिनही टप्प्यातील कामांदरम्यान आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने एकही वृक्ष तोडण्यात आलेले नाही.इतकेच नव्हे तर एखाद्या जागी मोठे वृक्ष येत असल्यास त्या वृक्षाचे सौंदर्य होत असलेल्या विकास कामात कसे वापरता येईल यासाठीही प्रत्यन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गांधी जयंतीपर्यंत ४५ टक्के कामे करणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:19 IST
शहरासह सेवाग्राम व पवनारचा कायापालट करण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या सेवाग्राम विकास आराखड्याच्या तीन टप्प्यातील कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
गांधी जयंतीपर्यंत ४५ टक्के कामे करणार पूर्ण
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस : सेवाग्राम विकास आराखड्यातील कामे युद्धपातळीवर सुरू