शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसाच्या नगराध्यक्षासाठी दुसऱ्या टप्प्यात शनिवारी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:22 IST

नगर परिषदेच्या कारभाराची माहिती बालपणापासून मिळावी या उद्देशाने नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी एक दिवसाचा बालनगराध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची लेखी परीक्षा नुकतीच पार पडली.

ठळक मुद्देप्रशांत सव्वालाखे यांची माहिती : परीक्षेत ४८ विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : नगर परिषदेच्या कारभाराची माहिती बालपणापासून मिळावी या उद्देशाने नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी एक दिवसाचा बालनगराध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतची लेखी परीक्षा नुकतीच पार पडली. यात १० शाळेतील ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आता दुसऱ्या टप्प्यात ६ जानेवारी रोजी वक्तृत्व कला चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांनी दिली.गांधी विद्यालयाच्या हॉलमध्ये झालेल्या या प्रथम प्रवेश निवड स्पर्धेकरिता येथील मॉडेल हायस्कूल, जिल्हा परिषद कन्या शाळा, आदर्श विद्यालय, कृषक कन्या विद्यालय, तपस्या इंग्लिश स्कूल, निर्मल इंग्लिश स्कूल, कन्नमवार विद्यालय, गांधी विद्यालय, नोबल किडस व कृषक इंग्लिश स्कूलच्या ५ ते १० च्या विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तरावर चाचणी घेत प्रत्येक शाळेने पाच विद्यार्थ्यांची निवड करून या परीक्षेत सहभाग नोंदविला होता. यातील दोन विद्यार्थी गैरहजर होते. सहभागी ४८ विद्यार्थ्यांनी ५० गुणांची लेखी परीक्षा दिली. त्यांना शनिवारी वक्तृत्व तथा जनसहभागाने होणारी परीक्षा पार करावी लागणार आहे. यात यशस्वितांना एक दिवसाचा बाल नगराध्यक्ष होण्याचा सन्मान प्राप्त होणार आहे. प्रा. सव्वालाखे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या एक दिवसाचा बाल नगराध्यक्ष संकल्पनेची प्रशंसा होत आहे. याद्वारे बालकांनाही न.प. ची माहिती प्राप्त होणार आहे.