शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाई द्या, कृषी पंपाची वीज तोडणी थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेले. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून रब्बीची तयारी चालविली. यादरम्यान अवकाळी पावसाने दणका दिल्याने नुकसानीत आणखी भर पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन-२०२० मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले असून, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. अशा स्थितीत महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची विद्युत जोडणी कापली जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी आणि विद्युत जोडणी तोडण्याचे काम थांबवावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेले. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून रब्बीची तयारी चालविली. यादरम्यान अवकाळी पावसाने दणका दिल्याने नुकसानीत आणखी भर पडली. या सर्व नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करून जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे १७८ कोटींची मागणी करण्यात आली. पण, अद्यापही रक्कम प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.एकीकडे शासनाकडे असलेला शेतकऱ्यांच्या हक्काचा मदत निधी दिला जात नाही तर दुसरीकडे पैश्याअभावी विद्युत देयक थकल्याने महावितरणकडून कृषी पंपाची जोडणी कापण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी आता रब्बी हंगामातीलही पीक  धोक्यात आले आहे. या अन्याविरुध्द आवाज उठविण्याकरिता भाजपाचे हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी याकरिता खासदार रामदास तडस, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, जि. प. च्या सभापती मृणाल माटे यांनी जिल्हाधिकारी  देशभ्रतार यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRamdas Tadasरामदास तडस