शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालयाच्या रगड्यात सर्वसामान्यांचे तेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

सर्वसामान्यांना ही ऑनलाईन प्रणाली समजण्यापलीकडे असल्याने ते काम सुरळीत आणि लवकर व्हावे, याकरिता मध्यस्थांचा आधार घेत आहे. आतापर्यंत येथील कार्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू होते. आतबट्याचा व्यवहार चालायचा पण, उघड चर्चा होत नव्हती. परंतु आता शासकीय दरवाढ आणि त्यामध्ये कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी अव्वाच्यासव्वा लादलेला अतिरिक्त ‘सेवा’भार यामुळे वाहनधारकांचा खिसा खाली होत आहे. मध्यस्थही ही रक्कम ग्राहकांकडूनच वसूल करतात.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने शासनाने उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत होणारी वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, फिटनेस प्रमाणपत्र आदींकरिता दरवाढ केली आहे. या दरवाढीने आधीच वाहनधारकांची अडचण झाली आहे. अशातच आता ‘साहेबां’नीही आपल्या तात्काळ ‘सेवा’कराचा अतिरिक्त भार टाकल्याने मध्यस्थांमार्फत काम करणाऱ्यांची अडचण झाली आहे. कार्यालयाच्या या अलिखित कारभारामुळे सर्वसामान्यांचे तेल निघत असल्याची चर्चा आता कार्यालय परिसरामध्ये रोजचीच कानावर पडत आहे.येथील उपप्रादेशिक परिवहन विभागामधील कामकाज ऑनलाईन असले तरीही मध्यस्थांचा विळखा घट्ट आहे. सर्वसामान्यांना ही ऑनलाईन प्रणाली समजण्यापलीकडे असल्याने ते काम सुरळीत आणि लवकर व्हावे, याकरिता मध्यस्थांचा आधार घेत आहे. आतापर्यंत येथील कार्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू होते. आतबट्याचा व्यवहार चालायचा पण, उघड चर्चा होत नव्हती. परंतु आता शासकीय दरवाढ आणि त्यामध्ये कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी अव्वाच्यासव्वा लादलेला अतिरिक्त ‘सेवा’भार यामुळे वाहनधारकांचा खिसा खाली होत आहे. मध्यस्थही ही रक्कम ग्राहकांकडूनच वसूल करतात. शासनाचे दर ठरविले असतानाही त्यावर दुप्पट रक्कम आकारली जात असल्याने वाहनधारकांमधून रोष व्यक्त होत आहे. मध्यस्थांचीही ग्राहकांना तोंड देताना चांगलीच अडचण होत आहे. एकंदरीतच सध्या उपप्रादेशिक परिवहन विभागातील कार्यालयाच्या कामकाजाबद्दल चांगलाच रोष व्यक्त होत आहे.

ट्रॅक्टर मालकाला दंडाचा धाक...-    शेतीकामाकरिता शेतकरी सातबाऱ्यांवर ट्रॅक्टर खरेदी करुन त्याची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी करतो. तो शेती उपयोगाकरिता असल्याने ट्रॅक्टरचा शुल्क माफ केला जातो. परंतु नोंदणी करताना त्याला विलंब झाल्यास पाच हजार रुपयांच्या दंडाचा धाक दाखविला जातो. त्यात तडजोड करुन २ हजार रुपये दंड आणि साहेबांचे २ दोन हजार असे ४ हजार रुपये मध्यस्तांमार्फ त जात असल्याचे एका ट्रॅक्टर चालकाने सांगितले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस