शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्रीशिप’ उत्पन्न मर्यादा निर्णयाच्या दिरंगाईबाबत वर्ध्यात असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 14:59 IST

राज्य शासनाने अद्याप नॉनक्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय काढला नाही. यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून शासनाच्या या धोरणाविरोधात नागपूर अधिवेशनादरम्यान अन्नत्याग आंदोलनाची तयारी ओबीसींच्या विविध संघटनांनी सुरू केली आहे.

ठळक मुद्देओबीसींमध्ये रोष हिवाळी अधिवेशनात अन्नत्याग आंदोलन करणार

आॅनलाईन लोकमतवर्धा : केंद्र शासनाने १३ सप्टेंबर २०१७ रोजी ओबीसींची क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा ६ लाखांवरून ८ लाख करण्याचा शासन निर्णय घेतला; पण दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही राज्य शासनाने अद्याप नॉनक्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय काढला नाही. यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून शासनाच्या या धोरणाविरोधात नागपूर अधिवेशनादरम्यान अन्नत्याग आंदोलनाची तयारी ओबीसींच्या विविध संघटनांनी सुरू केली आहे.केंद्र सरकारने सप्टेंबर २०१७ मध्ये ओबीसींची क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादा ६ लाखांवरून ८ लाख करण्याबाबतचा निर्णय घेतला; पण राज्य सरकारने नॉन क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय काढला नाही. हा निर्णय न झाल्यामुळे शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय अधांतरी आहे. सामाजिक न्याय विभागाच्या ६ आॅक्टोबर २००३, १२ मार्च २००७, १७ जानेवारी २००८, ३ फेब्रुवारी २०१२ व १३ मार्च २०१२ च्या शासन निर्णयानुसार शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची उत्पन्नमर्यादा ही क्रिमीलेअर उत्पन्न मर्यादेत असावी, असा निर्णय असल्याने क्रिमीलेअर उत्पन्नमर्यादेचा शासन निर्णय झाल्याशिवाय फ्रीशिप उत्पन्नाचा जीआर निघू शकत नाही; पण राज्य शासनाने याविषयी निर्णय न घेतल्याने ओबीसी समाजात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने हा मुद्दा तातडीने सोडवावा, अशी मागणी आहे.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ आॅक्टोबर रोजी नागपूर येथे एक बैठक घेण्यात आली. यात हिवाळी अधिवेशन काळात अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या बैठकीला ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर होते.तत्पर विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्री होताच झाले संथकॉँग्रेस सरकारच्या कार्यकाळात केंद्र शासनाने १६ मे २०१३ रोजी क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा ४.५ लाखांवरून ६ लाख करण्याचा निर्णय घेतला होता. लगेच राज्य शासनाने सात दिवसांच्या आत २४ जून २०१३ रोजी पुन्हा निर्णय घेऊन तत्परता दाखविली होती; पण फ्रीशिप उत्पन्नमर्यादा ४.५ लाखांवरून ६ लाख करण्याचा शासन निर्णय त्यावेळी झाला नाही. त्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री राज्यात विरोधी पक्षात असताना फ्रीशिपच्या उत्पन्न मर्यादेबाबत डिसेंबर २०१३ ते १५ या काळात त्यांनी वेळोवेळी विधीमंडळातील विविध आयुधांचा वापर करून सभागृह बंद पाडले, आंदोलन केले आणि २० आॅगस्ट २०१६ ला फ्रीशिपचा जीआर निघाला; पण आता राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही ओबीसी क्रिमीलेअर व फ्रीशिप उत्पन्नाचा शासन निर्णय घेतलेला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Politicsराजकारण