शहरं
Join us  
Trending Stories
1
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
2
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
3
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
4
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
5
सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
6
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
7
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
8
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
9
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
10
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
11
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
12
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
13
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
14
बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
16
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
17
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
18
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
19
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी

वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात आढळला बाज पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:12 IST

वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात विदर्भात क्वचितच आढळणाऱ्या सामान्य बाज ह्या पक्ष्याचे दर्शन त्यांना झाले.

ठळक मुद्देवर्ध्यातील पक्षी वैभवात भरवर्धा जिल्ह्यातील प्रथम नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव व पक्षी अभ्यासक यांची टीम सफारीकरीता रविवार, दिनांक १६ फेब्रुवारीला गेली असता तिथे विदर्भात क्वचितच आढळणाऱ्या सामान्य बाज ह्या पक्ष्याचे दर्शन त्यांना झाले. अशी नोंद येथे प्रथमच घेण्यात येत आहे. सफारीला पक्षी अभ्यासक राहूल वकारे, राजदीप राठोर, वन्यजीव अभ्यासक पराग दांडगे, मनोज भोयर, हिंदी विश्वविद्यालयातचे छायाचित्रकार आणि दस्तऐवजीकरण सहाय्यक राजदीप राठोर, डॉ. सुप्रिया व जिगी दांडगे व युवा वन्यजीव छायाचित्रकार आशय भोयर यांचा सहभाग होता.ई बर्ड या संकेत स्थळावरील पक्ष्यांच्या नोंदी नुसार विदर्भात यापूर्वी अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात या पक्ष्याची नोंद आहे.कॉमन बजार्ड या मध्यम आकाराच्या शिकारी पक्ष्याला मराठीत सामान्य बाज म्हणतात. याचे शास्त्रीय नाव बुटेओ बुटीओ असे आहे. हा पक्षी संपूर्ण युरोप, रशिया आणि थंड आफ्रिकेच्या उत्तर-आफ्रिकेला आढळतो. हिवाळ्यात हा पक्षी आशिया व दक्षिण आफ्रिका खंडात स्थलांतर करतो. हा युनायटेड किंग्डमचा सर्वात सामान्य शिकारी पक्षी आहे, जो तिथे जवळपास सर्वत्र आढळतो.या पक्ष्याचे जंगल, झाडीचा प्रदेश, उंच भागातील समशीतोष्ण गवताळ व पर्वतमय गवताळ भागातील ओसाड प्रदेश, खुरट्या झाडांनी आच्छादलेला प्रदेश, कृषियोग्य जमीन, सखल दलदलीचा प्रदेश, गांव व शहर अश्या विविध अधिवासात वास्तव्य असते.या पक्ष्याचा आकार साधारण ५१ ते ५७ सेंटीमीटर असून त्याच्या पंखांचा फैलाव ११० ते १३० सेंटीमीटर असतो. हे झाडीचा प्रदेशामध्ये सामान्यत: सीमांवर प्रजनन करतात. सामान्य: जंगले, मैदाने, पर्वत आणि खडकाळ प्रदेशात उंच वृक्षांवर घरटी करतात. याचे वजन ४२७ ते १३६४ ग्राम असून हा २५ वर्षे जगतो. याची उडण्याची सर्वोत्तम गती ४० किलो मीटर ताशी वेगात असते. याचा आवाज खूप वैशिष्ट्यपूर्ण असून तो मांजरीच्या म्यॉऊ आवाजासारखा असतो.सामान्य बाज हा पक्षी मांसाहारी असून तो पक्षी, लहान सस्तन प्राणी, तितर, ससा, साप आणि सरडे आणि हा एक उत्तम संधीसाधू असून मृत जनावराचे कुजके मांसही खातो. बºयाचदा अलीकडेच नांगरलेल्या शेतात अळी व किड्यांच्या शोधात फिरतांना दिसतो. जेव्हा त्याच्या खाद्याची कमतरता असते तेव्हा तो गांडुळ आणि मोठे कीटकही खातो.या पक्ष्याचा जोडीदार आयुष्यभरासाठी एकच असतो. जोडीदारास आकर्षित करण्यासाठी किंवा त्याच्या विद्यमान जोडीदारास प्रभावित करण्यासाठी वसंत ऋतूच्या सुरूवातीस विधीवत हवाई प्रदर्शन करतो. हे नेत्रदीपक प्रदर्शन 'रोलर कोस्टर' म्हणून ओळखले जाते.सामान्य बाज या पक्ष्याच्या महत्वपूर्ण नोंदीमुळे बोर व्याघ्र प्रकल्प तसेच वर्धा जिल्ह्यात आणखी एका नवीन पक्ष्याची भर पडली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांसोबतच पक्षी अधिवासाचेही संरक्षण व संवर्धन होत असल्याने पक्षी अभासकांसाठी हि आनंदाची गोष्ट आहे. यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाचे महत्व अधिकच अधोरेखित झाले आहे. या अगोदर २२ मार्च २०१६ रोजी निळ्या टोपीचा कस्तूर (ब्ल्यू-कॅप्पेड रॉक थ्रश) व २१ एप्रिल २०१६ रोजीतपकिरी माशीमार( अशियन ब्राऊन फ्लायकॅचर) हे पक्षी वर्धा जिल्ह्याचे पक्षी अभ्यासक राहुल वकारे यांना बोरधरण परिसरात प्रथमचआढळले होते.सामान्य बाज या पक्ष्याचे राहुल वकारे, पराग दांडगे, मनोज भोयर, राजदीप राठोर, आशय भोयर, डॉ. सुप्रिया व जिगी दांडगे यांनी केलेल्या महत्वपूर्ण नोंदीबद्दल बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, दिलीप विरखडे, दर्शन दुधाने आणि वर्धा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर आदींनी अभिनंदन केले.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य