शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

थंडीची चाहुल लागताच चुलीवरच्या जेवणाची रंगत

By admin | Updated: December 2, 2015 02:21 IST

आॅक्टोबरहिटचा तडाखा संपून नोव्हेंबरच्या शेवटी गुलाबी थंडीची चाहूल लागली. त्यामुळे हिरव्या भाज्या आणि विविध प्रकारची रसाळ फळे सध्या सहज उपलब्ध होत आहे.

हिरव्या भाज्यांचा वापर वाढला : अंगणात पेटू लागल्या चुली, रात्रीला रंगतात गप्पांचे फडपुलगाव : आॅक्टोबरहिटचा तडाखा संपून नोव्हेंबरच्या शेवटी गुलाबी थंडीची चाहूल लागली. त्यामुळे हिरव्या भाज्या आणि विविध प्रकारची रसाळ फळे सध्या सहज उपलब्ध होत आहे. गॅसवरील स्वयंपाकाला कंटाळलेल्या महिलावर्गांनी अंगणात तसेच जिथे चूल पेटविणे शक्य अशा ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जेवणाची रंगतही वाढली डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. दिवसाचे तापमान अद्यापही ३२ ते ३५ पर्यंत कायम राहात असले तरी रात्रीच्या तापमानात १५-१६ पर्यंत घट झाल्याने सकाळी थंडीची चाहूल लागत आहे. गुलाबी थंडीत पौष्टिक पदार्थाच्या सेवनाने आरोग्य सदृढ राहते. त्यामुळे हिरव्या भाज्यांबरोबर काजू, बदाम, अंजीर, किसमिस दूध आदी जिन्नसांची मागणी वाढली आहे.दिवाळीच्या फराळावर ताव मारल्यानंतर तुळशीविवाह चार्तुमास काकडा समाप्ती, वर्षावास, समाप्ती या माध्यमातून सामूहिक भोजनाच्या पंगतीचा आस्वाद घेतल्यानंतर आता ग्रामीण भागात रात्रीची जागली, शेकोट्या यातून थंडीचा आनंद घेत गप्पांचे फड जमू लागले आहे. शहरी भागात गॅसवरचे जेवण खाऊन कंटाळलेल्या महिलावर्गांनी चुलीवरच्या सामूहिक स्वयंपाकाकडे आपला मोर्चा वळविला असून चुलीवर शिजवलेली डाळतांदळाची खिचडी, तुरीचे हिरवे दाणे घालून केलेली आलू-वांग्याची रस्सेदार भाजी, ज्वारीच्या भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा असा मेन्यू सामान्य माणसाच्या जेवणाची रंगत वाढवित आहे. रात्रीला जाणवणाऱ्या थंडीमुळे लवकरच उबदार कपड्यांची मागणी वाढणार आहे. डिसेंबर महिना सुरू आहे. काहीच दिवसात गुलाबी थंडी वाढणार असून शेकोटीजवळ बसून भाजलेला मका, चना खाण्याची मजा काही वेगळीच असते. मिरची, पातीचा हिरवा कांदा, तुरीचे दाणे, हिरवे मटार घातलेले ताज्या वांग्याचे चुलीवरचे भरीत खवैय्यांच्या जीभेचे चोचले पुरविते. त्यामुळे वांग्याची मागणी व भाववाढले आहे. मेथी, पालक, कोथिंबिर आदी पालेभाज्यांची आवक बाजारात वाढत आहे. यामुळे महागाईमुळे वैतागलेल्या गृहिणींच्या चेहऱ्यावर समाधान पहावयास मिळत आहे. थंडीच्या दिवसात युवावर्ग व्यायामशाळेत जावून व्यायाम व घरी योगासने करून शरीर सुदृढ करण्याचा चंग बांधत आहेत. त्यामुळे दुधाची मागणीसुद्धा वाढली आहे. रात्रीपासून सकाळी ९ वाजेपर्यंत थंडीची चाहूल असली तरी दुपारचे तापमान मात्र संपूर्ण जिल्ह्यात कायमच आहे. कधी ढगाळ वातावरण, कधी उकाडा तर रात्री थंडी अशा बदलत्या वातावरणाने शहरात सर्दी, खोकला, ताप यासह संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे ग्रामीण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी रूग्णांची संख्या वाढत आहे. वातावरणातील बदलामुळे काही प्रमाणात डोळ्यांच्या आजाराची साथ असून आरोग्य यंत्रणेने केवळ कागदीघोडे नाचवण्यापेक्षा सतर्क राहून नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)शेकोटीचा आस्वादडिसेंबर महिना सुरू आहे. काहीच दिवसात गुलाबी थंडी वाढणार असून शेकोटीजवळ बसून भाजलेला मका, चना खाण्याची मजा काही वेगळीच असते. मिरची, पातीचा हिरवा कांदा, तुरीचे दाणे, हिरवे मटार घातलेले ताज्या वांग्याचे चुलीवरचे भरीत खवैय्यांच्या जीभेचे चोचले पुरविते. त्यामुळे वांग्याची मागणी व भाववाढले आहे. मेथी, पालक, कोथिंबिर आदी पालेभाज्यांची आवक बाजारात वाढत आहे.दररोज तेच तेच अन्न खाऊन कंटाळलेले नागरिक चुलीवरच्या मातकट पण चविष्ट भोजनाचा आनंद घ्यायला लागले आहे. यामुळे खवैय्यांच्या जीभेचे चोचले पुरविले जात आहे.