शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

क्षयरोग समूळ नष्ट करण्याचा सामूहिक संकल्प

By admin | Updated: March 25, 2017 01:14 IST

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र व अक्षया प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे.

जागतिक क्षयरोग दिन सप्ताहाचा प्रारंभ : जिल्हा क्षयरोग केंद्र व अक्षया प्रकल्पाचा सहभाग वर्धा : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र व अक्षया प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी क्षयरोग संपविण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. स्वाती पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. धाकटे, एमओडिटीटी डॉ. रेवतकर, गांधी मेमोरियल लेप्रेसी फाऊंडेशन सहसंचालक डॉ. बहुलेकर यांची उपस्थिती होती. दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास क्षयरोगाकरिता तपासणी करून लवकर निदान करावे. संपूर्ण उपचार केल्यास क्षयरोग पुर्णपणे बरा होऊ शकतो. क्षयरोग पूर्णपणे बरा होण्याकरिता योग्य औषधोपचार, फॉलोआपकडे सर्व कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे. चांगले आरोग्य घडविण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन प्रमोदकुमार पवार यांनी केले. प्रभावी औषधोपचार पद्धती व तपासणी तंत्रामुळे क्षयरोग बरा करणे कठीण नाही. रूग्णांनी चिकाटीने औषध नियमित घेणे, डॉक्टराच्या सुचनांचे पालन करणे, व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. प्रत्येक रूग्णाची तपासणी सुक्ष्म दर्र्शक केंद्रामध्ये झाली पाहिजे. जिल्हास्तरावर उपलब्ध सीबीएनएएटी मशीनमध्ये संशयित एमडीआर रूग्णांची थुंकी तपासणी करणे गरजेचे आहे. अनेकदा रूग्ण दुर्लक्ष करतात. अर्धवट उपचार कोणी सोडणार नाही यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती डॉ. अजय डवले यांनी यावेळी दिली. यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. स्वाती पाटील यांनी केली. यानंतर क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेया नऊ डॉट प्रोव्हायडर (आशा) यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल औषधी निर्माण अधिकारी यांना सुद्धा गौरविण्यात आले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम राबविले. यात रांगोळी, निबंध व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थिनी सहभागी होत्या. परीक्षण कार्यालय अधीक्षक डगळे, अधिपरिचारिका पुनसे यांनी केले. निवडक रांगोळी तसेच पोस्टरला बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजीव शेळके यांनी तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मानकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अक्षया प्रोजेक्ट अंतर्गत ताकसांडे व कर्मचारी, जिल्हा सामान्य नर्सिंग स्कूल, वर्धा येथील प्रशिक्षणार्थी, जिल्हा क्षयरोग केंद्र वर्धा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी) रॅलीतून केली जनजागृती क्षयरोग दिन सप्ताहानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र व अक्षया प्रोजेक्ट यांच्यावतीने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशन येथून रॅलीचा प्रारंभ करून क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. याप्रसंगी डॉ. बहुलेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी, कासाबाई नर्सिंग कॉलेज, गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशन, वर्धा, अक्षया प्रोजेक्टच्या हर्षदा सरोदे, अनिकेत कॉलेज आॅफ सोशल वर्क, डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्क येथील विद्यार्थी तसेच जिल्हा क्षयरोग केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. ही रॅली राम नगर, रेल्वे कॉलनी, राष्ट्रभाषा प्रचार समिती, पँथर चौक, शास्त्री चौक मार्गाने जात समारोप जिल्हा सामान्य रूग्णालय येथे केला.