शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

वृद्धेच्या पोटातून निघाला २६ किलोचा गोळा

By admin | Updated: February 20, 2016 03:04 IST

सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात भरती झालेल्या जमिलाबी खान ...

सावंगी (मेघे) रुग्णालयात शस्त्रक्रिया : महिलेची प्रकृती धोक्याबाहेरवर्धा : सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात भरती झालेल्या जमिलाबी खान या ६५ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून २६ किलो वजनाचा मांसल गोळा शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या काढण्यात आला.पोटावर मोठ्या प्रमाणात सूज आली आहे आणि त्यामुळेच अनेक दिवसांपासून पोटदुखी व श्वसनाचा त्रास होत आहे, असे समजून सदर स्त्रीला सावंगी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र रूग्णालयात प्राथमिक तपासणी केली असता अतिवाढ झालेले ट्युमर गर्भाशयात दिसून आले. त्यात कर्करोगाची शक्यताही दिसून येत असल्याने रूग्णाची तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी पोटातून २६ किलोचा मांसल गोळा काढण्यात आला. ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सी. हरिहरन यांच्यासह डॉ. मेहुल साळवे, डॉ. कल्याणी महाजन, डॉ. रैनी अग्रवाल, डॉ. सोमराज सरकार, डॉ. शबनम, डॉ. करूणा यादव यांचा या उपचार प्रक्रियेत सहभाग होता. रूग्णाला कर्करोगाची लागण झाली नसल्याचे चाचण्यातून आढळून आल्याने रूग्णाच्या परिवारास डॉक्टरांनीही सुटकेचा श्वास सोडला.सध्या जमिलाबी यांची प्रकृती पूर्णत: धोक्याबाहेर असून त्यांना सुटी देण्यात आल्याचे स्त्रीरोग व प्रसुती विभाग प्रमुख डॉ. दिप्ती श्रीवास्तव यांनी सांगितले.