निवडणूक आयोगाने केले स्पष्ट : ग्रामीण विकासाचा मार्ग मोकळावर्धा : निवडणुका नसणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगर पंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार आहे. त्यांना कोणतेही निर्बंध नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने एका पत्रान्वये स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने १७ आॅक्टोबरच्या पत्रान्वये एका जिल्ह्यात ४ वा त्यापेक्षा अधिक नगर परिषदा/नगर पंचायतींच्या निवडणुका असल्यास संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले होते. यामुळे निवडणुका नसतानाही ग्रामीण भागातील विकासांना खीळ बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. याबाबत अनेक क्षेत्रीय कार्यालयांकडून विचारणा करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका होणाऱ्या नगर परिषदा/नगर पंचायतीच्या क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव न टाकणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती/महानगर पालिका व नगर परिषदा/नगरपंचायतींच्या क्षेत्रातील कामे नेहमीप्रमाणे करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. वर्धा जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या निवडणुका असल्यामुळे या क्षेत्रात ही आदर्श आचार संहिता लागू राहणार आहेत. जिल्ह्यातील इतर भाग यातून वगळण्यात आला आहे. या भागात विकास कामे करण्यात लोकप्रतिनिधींना कोणतीही अडचण होणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
नगरपालिका क्षेत्रातच आचारसंहिता
By admin | Updated: October 21, 2016 01:59 IST