शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोसंबीच्या बगीच्यात बुलबुलने फुलविला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:41 IST

शहरातील सिमेंटची जंगलं आणि बदलेले राहणीमान यामुळे शहरातील पक्षांची किलबील काळाच्या आड जात आहे.पण, ग्रामीण भागातील शेतशिवार, बाग-बगीचे आणि गावातही पक्ष्यांचा अधिवास बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देखुशखबर...पोहणा परिसरात पक्ष्यांचा वाढतोय अधिवास : निसर्ग नियम बाजुला सारत दिला तीन पिलांना जन्म

अविनाश वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कपोहणा (बोपापूर) : शहरातील सिमेंटची जंगलं आणि बदलेले राहणीमान यामुळे शहरातील पक्षांची किलबील काळाच्या आड जात आहे.पण, ग्रामीण भागातील शेतशिवार, बाग-बगीचे आणि गावातही पक्ष्यांचा अधिवास बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहे. नुकताच एका मोसंबीच्या बगीच्यात लाल बुडाच्या बुलबुलने आपल्या तीन पिल्लांना जन्म देत आपल्या परिवारातील सदस्य संख्या वाढविली आहे.पोहणा (बोपापूर) परिसरात लाल बुडाच्या बुलबुल पक्ष्यांचा आधिवास बºयापैकी आहे. नुकताच बोपापूर शिवारातील एका मोसंबी बागेत झाडाच्या पानाआड आपले छोटेसे घरटे विणून तीन पिल्लांना जन्म दिला आहे. विशेषत: या पक्षाच्या विणीचा काळ हा फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान असतो. परंतू बदलत्या ऋुतूचक्राचा परिणाम पक्ष्यांवरही झाला की काय? तर या बुलबुलने निसर्गनियम बाजुला सारत आॅगस्ट महिन्यात आपली अंडी उबविली. या पक्षाला पक्षीमित्र रेड व्हेन्टेड बुलबुल या इंग्रजी नावानेही ओळखतात. या पक्षांने पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्या पिल्लांचे संगोपनही काळजीपूर्वक करीत आहे.असा असतो हा पक्षीया पक्ष्याचा आकार साधारणात: चिमणीपेक्षा थोडा मोठा असून मुख्य रंग धुरकट तपकिरी तसेच डोक्याचा रंग काळा व त्यावर लहान शेंडी असते. त्याच्या पाठीवर आणि छातीवर तुरक रेषांसारख्या खुणा असतात तर पाठीचा मागील भाग पांढरा असतो. त्याची मुख्य ओळख म्हणजे याचा पार्श्वभाग लाल रंगाचा असतो. यावरूनच याला लाल बुडाचा बुलबुल या नावाने संबोधतात.बुलबुलचा अधिवासहा पक्षी उष्णकटिबंधीय वनात, झुडपी जंगलात, शेतात व बागेत जोडीने किंवा लहान थव्याने राहणारा पक्षी आहे. भारतासह बांग्लादेश, श्रीलंका व म्यानमार येथेही आढळतो.नर व मादी दिसायला सारखेच असतात. या पक्ष्याचे घरटे जमिनीपासून १ ते १० मिटर उंचीपर्यंत झाडावर गवताचे खोलगट घरटे असते. मादी एकावेळी २ ते ३ फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी अंडी देते. नर-मादी पिलांचे संगोपन करण्यापासून सर्व कामे मिळून करतात. या पक्ष्याचे किटक, फळे, दाणे व मध हे मुख्य खाद्य आहेत.