वर्धा : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातवारण आहे. यात काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या. यामुळे गारठ्यात वाढ झाली असली तरी शेतकऱ्याची चिंता बळावत आहे. सोयाबीन सवंगणीला आले आहे तर कपाशीची बोंडं फुटली आहेत. या पावसामुळे दोनही उत्पादनाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.शेतात सोयाबीन सवंगणीला आहे, अशात आकाशात दाटून आलेल्या ढगांमुळे सोयाबीनची कापणी कशी करावी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शिवाय काहींनी कापणी करून सोयाबीनचे ढीग शेतात उभे केले आहेत. पावसामुळे ते ओले होवून नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय कपाशीची बोंडे फुटून कापूस बाहेर येत आहे. यात जर पाऊस आला तर काूपस ओला होवून त्याचा दर्जा घसरण्याची शक्यता आहे. या वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे चिंता वाढत आहे. (प्रतिनिधी)
ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली
By admin | Updated: October 26, 2014 22:44 IST