शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मातीवर वाळतात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 23:51 IST

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर डल्ला मारून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडल्याचा प्रकार तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील महात्मा ज्योतिबा फुले आदिवासी आश्रम शाळेत बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देदहेगाव (गोसावी) येथील प्रकार : चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर डल्ला मारून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडल्याचा प्रकार तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील महात्मा ज्योतिबा फुले आदिवासी आश्रम शाळेत बघावयास मिळत आहे. येथील विद्यार्थ्यांचे कपडे चक्क मातीवर वाळत असून हा प्रकार आदिवासी नेते अवचित सयाम यांनी बघितल्यावर त्यांनी चौकशी करून दोषींवर योग्य कारवाईची मागणी केली आहे.आदिवासी नेते अवचित सयाम हे दहेगाव येथील शुभांगी उईके हिच्या मृत्यू प्रकरणी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तेथे गेले असता त्यांना येथील आदिवासी आश्रम शाळेतील हा किळसवाना प्रकार दिसून आला. त्यांना शाळा शेजारी असलेल्या खुल्या मैदानात चक्क मातीवर विद्यार्थ्यांचे कपडे वाळत असल्याचे दिसून आले. आदिवासी विभागाकडून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कपडे धुण्यासाठी तर वाळविण्यासाठी निधीची तरतूद करून तो पुरविण्यात येतो; पण या ठिकाणी उघड्यावर कपडे वाळत घालण्याचा प्रकार पाहून आश्रम शाळेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या कपड्यांना मातीचा संसर्ग होऊन चिमुकल्यांच्या आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा असून त्याबाबत आदिवासी नेते अवचित सयाम हे संबंधितांना लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आश्रम शाळेतील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणीही आहे.