लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत परिसरातील हजारो लोकांचे खाते आहे. या परिसरात राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव ही शाखा असल्याने ग्राहकांना येथून व्यवहार करावे लागतात . मात्र बँकेत रोखेचा तुटवडा असल्याने ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागतो. येथील को-आॅॅपरेटीव्ह बँकेची शाखा बंद झाल्याने या बँकेवर अधिक भार वाढला आहे. त्यामुळे खातेदारांना ठराविक रक्कम दिली जात आहे. परिसरातील शेतकरी, बचत गट, कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी यांचे खाते याच बँकेत आहे. येथे रोखेची कमतरता ही नित्याचीच बाब झाली आहे. ग्राहकांच्या मागणीनंतर येथे नव्यानेच एटीएम केंद्र सुरू करण्यात आले. मात्र एटीएम बंद राहत असल्याने ग्राहकांच्या अडचनीत भर पडत आहे. एकीकडे बँकेने ठराविक रक्कमेचा विड्रॉल देणे सुरू केले. ग्राहकांना कधी तर रोख न घेताच परतावे लागते. काही ग्राहकांना एटीएम काढण्यास अडचण निर्माण आर्थिक व्यवहार कसा करावा याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँक व्यवस्थापक चेकचा वापर करा, असा आदेश देतात. रोखरहीत व्यवहार करण्यावर भर देण्यात येत असला तरी येथे तशा सुविधा नसल्याने ग्राहकांची गोची होत आहे. शेतकऱ्यांना आता नव्याने कर्ज ह्जायचे असल्याने बँकेत गर्दी होत आहे. एटीएम देताना बँक व्यवस्थापनाकडून अनेक नियम लावण्यात आल्याने ग्राहकांची फजिती होत आहे.
बंद एटीएम व ‘नो कॅश’ ने ग्राहक त्रस्त
By admin | Updated: May 18, 2017 00:37 IST