शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रावण दहण प्रथा बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:23 IST

महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसांचा देदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. ते विविध गुणांचा समुच्चय आहे. त्यामुळे रावण दहण प्रथा बंद करावी तसेच दहण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी संघर्ष कृति समितीच्यावतीने केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी संघर्ष कृति समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसांचा देदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. ते विविध गुणांचा समुच्चय आहे. त्यामुळे रावण दहण प्रथा बंद करावी तसेच दहण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी संघर्ष कृति समितीच्यावतीने केली आहे.या मागणीचे उपविभागीय अधिकाºयां मार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.राजा रावणासारखा महापराक्रमी योध्दा झाला नसून यापुढेहीे होणार नाही. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत. सर्वात मोठी मुर्ती ही मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मिटर उंचीची आहे. महाराष्टÑात अमरावती जिल्ह्यात मेळघाट, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड येथे रावणाची पूजा केली जाते. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रध्दास्थान व दैवत आहे. परंतु आदिवासींच्या या समताधिष्ठीत समाज व्यवस्थेचा उद्गाता असलेल्या न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून रावण दहण करण्याची परवानगी न देता; ही प्रथाच बंद करण्यात यावी.दसºयाच्या दिवशी रावण दहण करण्याचा प्रयत्न केला तर सर्व आदिवासी संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येईल. या दरम्यान जे बगर आदिवासी यांचे समर्थन करतील, आमच्या भावना दुखावतील, आमच्या न्यायप्रिय राजाचा अपमान करतील अशा लोकांविरूध्द अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३, १५३ (अ), २९५, २९८ मुंबई पोलीस कायदा १३१, १३४, १३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी आदिवासी संघर्ष कृति समितीच्या वतीने निवेदनातून केली आहे. उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना संघर्ष समितीचे शंकर मोहमारे, विनोद उईके, अमोल सलामे, सुभाष पुटके, सोनु मडावी, नलिनी सयाम, संजय सयाम, नरेश उईके यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Dasaraदसरा