शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या कामाची ‘घडी’ विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

सकाळी १० वाजता या कार्यालयात फेरफटका मारला असता महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कुलूपबंदच असल्याचे दिसून आले. तर  गट क्षिक्षण अधिकारी कार्यालयात दोनच कर्मचारी उपस्थित होते. यात बुचे व माहूरे नामक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर आस्थापना विभागात एकच कर्मचारी हजर होता. व शिपाई उपस्थित होता.

ठळक मुद्देसेलू पं.स.तील प्रकार : कामकाजावर होतोय परिणाम, नागरिकांना त्रास

  लोकमत न्यूज नेटवर्क सेलू (घोराड) : तालुक्यात असलेल्या पंचायत समिती कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कामाची घडी विस्कटली असून याचा कामकाजावर मोठा परिणाम होतो आहे. त्यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.मंगळवारी  सकाळी कार्यालय उघडण्याच्या वेळी या कार्यालयातील काही विभागाचे कुलूपही उघडल्या गेले नव्हते. तर काही विभागाचे दरवाजे उघडे असले तरी सकाळी  १० वाजता बोटावर मोजण्या इतपतही कर्मचारी हजर नव्हते. काही अधिकारी कार्यालयातच आले नव्हते. येथे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व बहुतांश कर्मचारी वर्धा व नागपूर येथून ये जा करतात.सकाळी १० वाजता या कार्यालयात फेरफटका मारला असता महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कुलूपबंदच असल्याचे दिसून आले. तर  गट क्षिक्षण अधिकारी कार्यालयात दोनच कर्मचारी उपस्थित होते. यात बुचे व माहूरे नामक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर आस्थापना विभागात एकच कर्मचारी हजर होता. व शिपाई उपस्थित होता. मात्र, कार्यालयीन कामकाजाच्या वेळा पाहता या कार्यालयात  बहुतांश कर्मचारी हे सकाळी १० नंतरच येत असल्याचे चित्र नेहमीचेच असून या लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर लगाम कोण लावणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.  या कार्यालयात अनेक नागरिक विविध कामासाठी येतात. मात्र, कार्यालयात कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित राहत नसल्याने अनेकांना आल्या पावली परतावे लागत असल्याने नागरिकांना याचा मनस्ताप होतो.या पंचायत समितीत असणारे कार्यालयात काहीच कर्मचारी वेळेवर येत असून काही कर्मचाऱ्यांना सवलत तर नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. तर शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांचे लेटलतीफ येणे हे नित्याचेच झाले असल्याचा आरोप नागरिकांतून् करण्यात येत आहे.

कार्यालय प्रभारी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रभारी, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रभारी, तर गटशिक्षणाधिकाऱ्यांचा भार प्रभारीच्या खांद्यावर आहे. बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याकडे वर्धा व सेलू चा पदभार असल्याने येथील मुख्य पदे हे प्रभारींच्या खांद्यावर असल्याचे  चित्र आहे.

 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती