शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धाडी गावात अस्वच्छतेचा कळस; आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:50 IST

धाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक वर्षापासून गावातील नाल्या साफ केल्या नाही.

नाल्या तुंबल्याने साचली गटारगंगा : ग्रामपंचायत विकास कामे सोडून राजकारणात दंग लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : धाडी ग्रामपंचायत अंतर्गत एक वर्षापासून गावातील नाल्या साफ केल्या नाही. यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते. पाणी वाहून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने गटारगंगा साचली आहे. ग्रामसेवक सुटीवर असून सरपंच विकास सोडून राजकाणात दंग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. नाल्या तुंबल्यामुळे अळ्या तयार झाल्या आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार तोंड वर काढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी उकिरडे साचले आहे. त्याखाली पाणी साचल्याने अळ्यांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक विहिरीत ब्लीचिंग पावडर टाकले नाही. यामुळे गावातील नागरिकांना दूषित व गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामस्थांनाही त्याच पाण्याची सवय करून घ्यावी लागत आहे. शौचालय बांधकाम अपूर्ण असल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गावातील पथदिवे कित्येक वर्षांपासून पडलेले आहेत. गावातील नागरिक कराचा भरणा करीत असले तरी ग्रा.पं. च्या दुर्लक्षामुळे त्यांना प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. आष्टी-साहूर मार्गावर धाडी गाव असल्याने येथे अधिकारी वारंवार भेटी देतात. असे असले तरी ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छता करीत नाही. पाटील यांच्या घरासमोर मोठे डबके साचले आहे. वॉर्ड क्र. २ मध्ये घाण साचली आहे. वॉर्डातील नागरिक ओरडून थकले; पण कारवाई झाली नाही. मोठी ग्रामपंचायत असताना विकास कामांत माघारल्याचे दिसून येत आहे. गावातील सूमार दर्जाची कामे केविलवाणी अवस्था दर्शविणारी आहे. रस्त्यावरील उकिरडे साफ करून दुर्गंधी दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी धाडी गावाला एकदा भेट द्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.