शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्रांजवळ राबविणार स्वच्छता मोहीम

By admin | Updated: April 17, 2017 00:49 IST

वीज वितरण रोहित्रांजवळ कचरा टाकला जातो. परिणामी, वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.

महावितरणच्या मुख्य अभियंत्यांचे निर्देश वर्धा : वीज वितरण रोहित्रांजवळ कचरा टाकला जातो. परिणामी, वीज पुरवठ्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. हा कचरा काही अज्ञात जाळत असल्याने रोहीत्र व वीज तारांना नुकसान होते. कचऱ्यावर पक्षी येऊन ते तारांवर बसल्याने अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे रोहित्राजवळ स्वच्छता मोहीम राबविण्याच्या मुख्य अभियंत्यांच्या सूचनांवरून २० एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नागपूर परिमंडळात सर्वत्र ही मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याच्या सूचनाही मुख्य अभियंत्यांनी दिल्या आहेत. यासाठी परिमंडळातील प्रत्येक कार्यकारी अभियंत्यांनी उपविभागीय अभियंत्यांशी चर्चा करून कार्यक्रमाची आखणी करावयाची आहे. यासाठी ज्या-ज्या वितरण रोहित्राजवळ कचरा टाकण्यात येतो, ती नेमकी जागा हेरून तेथे ही मोहीम राबवायची आहे. सोबतच या मोहिमेत परिमंडळ, मंडळ, विभाग, उपविभाग आणि शाखा कार्यालयातील प्रत्येक अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने पुढाकार घेऊन त्याचा अहवाल व छायाचित्रे परिमंडळ कार्यालयाला गुरुवारी सायंकाळपर्यंत पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)