शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ला ग्रामीण भागात खोे

By admin | Updated: March 29, 2015 02:10 IST

उघड्यावर होत असलेल्या शौचामुळे अनेक आजार जडत असल्याचे पुढे आल्याने गावागावात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

वर्धा : उघड्यावर होत असलेल्या शौचामुळे अनेक आजार जडत असल्याचे पुढे आल्याने गावागावात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शासकीय अनुदानावर शौचालय बांधण्याची योजना अंमलात आली. अनेकांनी योजनेचा लाभ घेत शौचालय बांधले; मात्र त्याचा वापर होत नसल्याचे गावाच्या शिवेवर जाताच दिसून येते. कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी गाव येताच येणारी दुर्गंधी कायमच असल्याचे दिसते. यावर प्रतिबंध लावण्याकरिता उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरिता पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर ‘गुड मॉर्निंग पथक’ निर्माण करण्यात आले. या पथकांतर्गत कोणतीही कारवाई होत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. शासनाची ही योजना राबविण्यात कर्मचारीही निरस असल्याने ती यशस्वी होत नसल्याचे दिसून आले आहे. उघड्यावर शौच करणाऱ्यावर कारवाई करण्याकरिता विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. ग्रामपंचायत अधिनियम १९८५ च्या कलम ४९ अंतर्गत ग्रामपंचायतचे कार्य चालविण्यासाठी विविध ग्राम विकास समितीचे गठन करण्यात आले आहे. यात गावातील गणमान्य व्यक्तीचा समावेश असेल. समितीच्या सदस्यांना शौचालय उपयोगाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर ‘गुड मॉर्निंग पथक’च्यावतीने गस्त घालण्याचे आदेशात म्हटले आहे. ग्रामीण क्षेत्रातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा उपयोग करीत आहेत. स्वच्छ भारत मिशनच्यावतीने वॉटसअ‍ॅपसारखे अ‍ॅप तयार करून स्वच्छतेसंबंधी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घाण पसरविणाऱ्यांवर काय कारवाई केली जाऊ शकते, याची माहिती तांत्रिक माध्यमाने देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात अद्यापही झालेली नाही. या निर्णयावर कारवाई सुरू झाली त्यावर अंमलबजावणीची शंकाच आहे. ग्रामीण भागात शासनाच्या योजना कुचकामी ठरत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)