शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ अभियान

By admin | Updated: October 8, 2014 23:29 IST

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळांमध्ये ‘स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ते अभियान राज्यातील प्रत्येक शाळा,

शाळांचा सहभाग : विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनासुरेंद्र डाफ - आर्वी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळांमध्ये ‘स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ते अभियान राज्यातील प्रत्येक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात ३१ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळेत हे उपक्रम राबविण्यात यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने सर्व शाळांना केल्या आहे.‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छतेविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत शिक्षण विभागाचे अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक, शालेय कर्मचारी व विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना इतरांना स्वच्छ गाव आरोग्य विषयक नाविण्यपूर्ण उपक्रमावी निवड व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांप्रती शालेय व विद्यालयीन शिक्षणाची भूमिका व त्याचा विद्यार्थ्यांच्या विकासगुणाचा दर्जा कायम राखून आदर्श कलागुणांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात यावे, यातून विद्यार्थ्यांना पोषक व उत्साहवर्धक तसेच शालेय उपस्थितीत विद्यार्थ्यांची वाढ होईल हा शालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून दर्जेदार शिक्षण घेण्यामध्ये या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होईल हा हेतू या स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अभियाना समोर ठेवण्यात आला आहे. या अभियानात शालेय स्तरावर दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात आरोग्य विषयक शपथ, शिक्षणाची पालखी, स्वच्छता ज्ञानयात्रा परिक्रमा, स्वच्छतेवर विद्यार्थ्यांची भाषणे शालेय परिसर स्वच्छता, निबंध स्पर्धा, मेळावे, शाळामध्ये स्वच्छतागृहे, पाण्याची उपलब्धता, मेळावे, निबंध स्पर्धा, स्थानीक कलाकारांच्या माध्यमातून जनजागृती, शैक्षणिक प्रदर्शन, कार्यालयीन स्वच्छता, हँडवॉश दिन आदी बाबींचा ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या अभियानात समावेश करण्यात आला आहे. यामुळे शाळांशाळांत यानुसार काम सुरू आहेत.