शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींनी घेतला कापूस व्यापाऱ्यांचा ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:45 IST

बाजार समितीच्या यार्डमध्ये लिलाव झाल्यानंतर ठरलेल्या भावावर कायम न राहता प्रती क्विंटल ५०० रुपयांपर्यंत दर कमी दिले जात आहे. व्यापाऱ्यांच्या जीनिंगमध्ये गाडी खाली करताना कापसाच्या गुणवत्तेचे कारण सांगून नागविले जात आहे.

ठळक मुद्देगुणवत्तेवरून ५०० रुपयांपर्यंत पाडतात भाव

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : बाजार समितीच्या यार्डमध्ये लिलाव झाल्यानंतर ठरलेल्या भावावर कायम न राहता प्रती क्विंटल ५०० रुपयांपर्यंत दर कमी दिले जात आहे. व्यापाऱ्यांच्या जीनिंगमध्ये गाडी खाली करताना कापसाच्या गुणवत्तेचे कारण सांगून नागविले जात आहे. याबाबत तक्रारी मिळताच कृउबास सभापती मनोहर खडसे यांनी लिलाव थांबवून तब्बल तीन तास संबंधित व्यापाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला.कापसाच्या गुणवत्तेवरून एकदा ठरलेला भाव व्यापाऱ्यांना परस्पर कमी करता येणार नाही. अशा कापूस गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करून भाव कमी-अधिक करण्याचा अधिकार बाजार समितीकडे राहील, असे निर्देशही सभापती खडसे यांनी खासगी व्यापाºयांना बैठकीत दिले.कापसाची मुख्य बाजारपेठ म्हणून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. येथील यार्डमध्ये भावबाजीतील तफावतीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांत संंभ्रम निर्माण झाला होता. लिलावाच्या वेळी वेगळा भाव तसेच जीनिंगमध्ये गाडी खाली करताना गुणवत्तेचे कारण सांगून कमी भाव दिला जात होता. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड होती. या बाजार समितीत आजपर्यंत ३.७५ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यात केवळ १५ हजार क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने तर उर्वरित खरेदी खासगी व्यापाऱ्यांनी केली. सीसीआयची खरेदी असल्याने या बाजारपेठेत बऱ्यापैकी भाव मिळत असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी विविध कारणे देत ठरलेला भाव कमी करण्याचा प्रकार होत आहे. या बाजारपेठेची पत कायम ठेवण्यासाठी सीसीआयने खरेदीचा टक्का वाढवून अधिकाधिक कापूस खरेदी करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.