शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मातीतील खेळाला संघटनेच्या वादाचा खोडा

By admin | Updated: July 15, 2014 00:07 IST

अस्सल मातीतील खेळ म्हणून ओळख असलेल्या कबड्डीने एकेकळी लोकप्रियतेचे सवौच्च शिखर गाठले होते. क्रिकेटची वाढती रसिकता या खेळाला मारक ठरली असली तरी संघटनेतील वाद खेळाच्या प्रसाराला

श्रेया केने - वर्धाअस्सल मातीतील खेळ म्हणून ओळख असलेल्या कबड्डीने एकेकळी लोकप्रियतेचे सवौच्च शिखर गाठले होते. क्रिकेटची वाढती रसिकता या खेळाला मारक ठरली असली तरी संघटनेतील वाद खेळाच्या प्रसाराला आणि प्रचारातील मुख्य अडसर बनत आहे. जिल्हा आणि विदर्भ संघटनेतील वादामुळे खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे. या वादामुळे संघटनेवर ‘स्टे’ येण्याची टांगती तलवार आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.कबड्डी या खेळाला गौरवशाली परंपरा आहे. जिल्ह्याने ही ७० आणि ८० च्या दशकात सुवर्णकाळ अनुभवला आहे. काशीनाथ रिठे यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. यात अन्य खेळाडूंनीही भर घातली. एकेकाळी जिल्ह्यात ८० हून अधिक क्लब होते. आता ही आकडेवारी ४० पर्यंत आली आहे. ग्रामीण भागात आजही कबड्डीचा असलेले वलय तसूभरही ओसरले नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यात तीन संघटना कार्यरत आहेत. विदर्भ संघटनेतील वाद २० वर्षांपासून प्रलंबित आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले आहे. यावर शासनाने आणि क्रीडा संचनालयाने मध्यस्थीची भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गौरवशाली परंपरा-जिल्ह्याला या खेळात गौरवशाली परंपरा लाभली आहे. राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्याचा मानही मिळाला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे यजमानपद जिल्ह्याकडे होते. मात्र दिवसेंदिवस या खेळाकडील पे्रक्षक आणि खेळाडूंचा कल ओसरत आहे. -जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेतही दबदबा निर्माण केला. या हिंगणघाट येथील दिवंगत कबड्डीपटू काशीनाथ रिठे यांचा काळ हा जिल्ह्यातील कबड्डीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना प्रेक्षकांनी ‘बंगालचा टायगर’ अशी उपाधी बहाल केली होती. याशिवाय रणजितसिंग ठाकूर, किशोर पोफळी, विजय रिठे, विनोद बिरे, भीमराव ढोक, मुरली फाले या खेळाडूंनी जिल्ह्याचा नावलौकिक केला. महिलांत सीमा दुबे, योगिनी निमसडे सह गुणवंत खेळाडूंनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि विद्यापीठ संघात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. -जिल्ह्यातील खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळविता आला नसला तरी या खेळाच्या प्रकाराकरिता सुभाष पिसे यांना राज्य शासनाने शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.