शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बाजारपेठेत सॅनिटायझर, मास्कची भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 05:00 IST

जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, या विषाणूजन्य आजाराचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. दिवसातून किमान तीन ते चारवेळा आणि शक्य होईल तेव्हा हात स्वच्छ धुण्यासोबतच स्वच्छता बाळगण्याच्या सूचना आहेत. घाबरू नका, पण काळजी अवश्य घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा धसका । माल नसल्याने कंपन्यांकडून पुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पुणे आणि नागपूरमध्ये कोरोना विषाणूसंसंर्गित रुग्ण आढळून आले आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांकडून सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी केली जात आहे. मात्र, सद्यस्थितीत बाजारपेठेत एकाही औषधविक्रेत्याकडे सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध नसून प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे.जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, या विषाणूजन्य आजाराचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. दिवसातून किमान तीन ते चारवेळा आणि शक्य होईल तेव्हा हात स्वच्छ धुण्यासोबतच स्वच्छता बाळगण्याच्या सूचना आहेत. घाबरू नका, पण काळजी अवश्य घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी संपूर्ण जिल्ह्यात बुधवारपासून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. ज्यादा दराने मास्कची विक्री आणि औषधाची साठेबाजी करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे. भीतीपोटी अनेक नागरिकांनी सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी केली. अद्याप नागरिकांचा खरेदीकडे कल आहे. मात्र, शहरात मागील पंधरा दिवसापासून सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध नसल्याची माहिती एका ठोक औषधविक्रेत्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.वर्ध्यात मुंबई, नवी दिल्ली आणि नागपूर येथून सॅनिटायझर आणि मास्कचा ठोक औषधविक्रेत्यांना पुरवठा होतो. या औषधविक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना या वस्तूंचा पुरवठा केला जातो. मात्र, चीनमधील वुहानमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणावर या वस्तूंची निर्यात झाल्याचे सांगण्यात येते. याचाच परिणाम आता कंपनीतच माल नसल्याने त्यांनी पुरवठा बंद केला आहे. टंचाई निर्माण झाल्याने आणि मागणी वाढल्याने राज्यातील अनेक बड्या शहरांमध्ये या वस्तूंचा काळाबाजारही फोफावला असल्याची वास्तविक स्थिती आहे. मुंबई येथे अन्न व औषध प्रशासनाने नुकत्याच घातलेल्या छाप्यात बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त करण्यात आला.केवळ २० तास करता येतो वापरडिस्पोझेबल मास्कचा वापर केवळ साधारणत: २० तासांकरिता करता येतो. मात्र, अनेकांनी खरेदी केल्यानंतर सलग पाच ते सहा दिवस त्याचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. वास्तविक एक दिवसापेक्षा अधिक दिवस त्याचा वापर करू नये, असे तज्ज्ञ डॉक्टर औषधविक्रेत्यांचे म्हणणे आहे. वापरानंतर डिस्पोझेबल मास्कची जाळून व अन्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.बाजारपेठेत फॅन्सी मास्क दाखलकोरोनाचा धसका घेतल्याने नागरिकांची पावले मास्क खरेदीकडे वळू लागली आहेत. मात्र, शहरातील बाजारपेठेत औषधविक्रेत्यांकडे मास्क उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक कापड दुकानात आणि हातगाड्यांवर सहज उपलब्ध होत असलेल्या जाळीदार कापडाचे मास्क खरेदी करीत आहेत. वातावरण लक्षात घेता काही व्यावसायिक संधीचे सोने करीत असल्याचे चित्र आहे.असे आहेत मास्कचे प्रकारमास्कमध्ये टू लेअर, थ्री लेअर, एन-९५ आणि डिस्पोझेबल याशिवाय अन्य प्रकार होतात. वर्गीकरणानुसार मास्कचे दर आहेत. यापूर्वी पाच रुपयांना मिळणाºया डिस्पोझेबल मास्कसह इतर मास्कला मोठी मागणी वाढली. मात्र, कंपन्यांकडून ठोक विक्रेत्यांना पुरवठाच बंद झाल्याने औषधविक्रेत्यांकडे कुठल्याच प्रकारचे मास्क उपलब्ध नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना