शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विद्रूपीकरणाचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:39 IST

पावसाळ्याच्या सुरूवातीला पालिकेच्यावतीने मोठा निधी खर्च करून शहरातील मोठे व मध्यम नाले स्वच्छ करण्यात येतात. परंतु, सध्या शहरातील विविध मंगल कार्यालयांमधील कचरा व उर्वरित अन्न थेट शहरातील मोकळ्या मैदानांसह मोठाल्या नाल्यांमध्ये टाकले जात असल्याने हा प्रकार शहराच्या विद्रूपिकरणास कारणीभूत ठरत आहे.

ठळक मुद्देनाकाला रूमाल लावून करावी लागते ये-जा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्याच्या सुरूवातीला पालिकेच्यावतीने मोठा निधी खर्च करून शहरातील मोठे व मध्यम नाले स्वच्छ करण्यात येतात. परंतु, सध्या शहरातील विविध मंगल कार्यालयांमधील कचरा व उर्वरित अन्न थेट शहरातील मोकळ्या मैदानांसह मोठाल्या नाल्यांमध्ये टाकले जात असल्याने हा प्रकार शहराच्या विद्रूपिकरणास कारणीभूत ठरत आहे. सदर कचऱ्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.वर्धा शहरासह परिसरात सुमारे ३० मंगलकार्यालयांसह लॉन आहेत. जी मंगलकार्यालये व लॉन वर्धा न.प.च्या हद्दीत येता अशांना यापूर्वी न.प.च्या स्वच्छता विभागाने कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या; पण सध्यास्थितीत पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे सदर व्यावसायिकांकडून दुर्लक्षच करण्यात येत असल्याचे दिसून येते.अनेक मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर गोळा होणारा कचरा व उर्वरित अन्न सध्या थेट मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानांमध्ये टाकले जात आहे. इतकेच नव्हे तर काही जण सदर कचरा थेट नाल्यांमध्ये टाकत असल्याने ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिकांकडून सुरू असलेला हा मनमर्जी कारभार शहराच्या विद्रूपिकरणात भर टाकणारा ठरत आहे. सदर कचऱ्यामध्ये सर्वाधिक पूर्णपणे न जळणारा, न नष्ट होणाऱ्या प्लास्टिकचा समावेश असल्याचे दिसून येते. सदर प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून तात्काळ पालिकेच्या स्वच्छता विभागातील वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.नाकाला रूमाल लावून करावी लागते ये-जाशहरातील गणेश टॉकीज परिसरातून पुलफैलकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यात काही लॉन व मंगल कार्यालय व्यावसायिकांकडून कार्यक्रम संपल्यानंतर लॉन व कार्यालयांमधील उर्वरित अन्न व कचरा टाकल्या जात आहे. या उर्वरित अन्नाच्या दुर्गंधीमुळे सदर परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच पुढील प्रवास करावा लागत आहे.सोमवारपासून न.प. स्वच्छता व आरोग्य विभागाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान पाहणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- प्रवीण बोरकर,आरोग्य विभाग प्रमुख, न.प. वर्धा.वर्धा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शेजारून पुलफैलकडे जाणाऱ्या मार्गावर गणेश टॉकीज जवळील नाल्यात लॉन व मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर कचरा टाकल्या जात आहे. या कचऱ्यात उर्वरित अन्न तसेच प्लास्टिकचा सर्वाधिक समावेश राहतो. सदर प्रकारामुळे नाला बुजण्याची भीती बळावत आहे.