शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पालिकेच्या साथीने शहर टाकतेय कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:44 IST

नगरपालिकेच्या रामभरोसे कारभाराला आळा घालत शहराच्या विकासाला प्राधान्य दिले जात असल्याचे विविध लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून दिसून येत आहे. पालिके च्या तिजोरीवर दर महिन्याला विद्युत देयकाचा १३ ते १५ लाखांचा भार पडत होता.

ठळक मुद्देविजेचा अपव्यय थांबवून उत्पन्नवाढीवर भर : एलईडीच्या प्रकाशाने उजळणार रस्ते

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगरपालिकेच्या रामभरोसे कारभाराला आळा घालत शहराच्या विकासाला प्राधान्य दिले जात असल्याचे विविध लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून दिसून येत आहे. पालिके च्या तिजोरीवर दर महिन्याला विद्युत देयकाचा १३ ते १५ लाखांचा भार पडत होता. त्यामुळे नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच अतुल तराळे यांनी एनर्जी आॅडिट करून वीजगळती थांबविली. तसेच देखभाल दुरुस्तीवर होणाऱ्या अवाढव्य खर्चाला चाप लावत हेच वीज देयक आता ८ लाखांवर आणण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे विजेचा अपव्यय थांबून पालिकेच्या निधीची बचत झाली आहे.पालिकेने इतरही कामातील गळतीला आवर घालत प्राप्त निधीच्या जोरावर विविध उपक्रम हाती घेऊन शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. मागील दोन वर्षांत नगराध्यक्षांच्या अभ्यासपूर्ण व्यवस्थापनामुळे विजेच्या संवर्धनात मोठी उपलब्धी मिळविली आहे. त्यांनी एस.एल.मार्फत पारंपरिक पथदिवे काढून त्या ठिकाणी निम्म्या पॅकेजचे एलईडी पथदिवे लावण्याचे काम शहरात सुरु असून ते अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येणारे विद्युत देयक हे प्रचंड कमी होऊन साधारणत: ३ ते ४ लाखांपर्यंत येणार असल्याचा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी पुतळा, महात्मा गांधी चौक ते सेवाग्राम उड्डाणपूल, बजाज चौक ते देवळीनाका, बजाज चौक ते बोरगाव रोडवरील नगर पालिकेच्या हद्दीपर्यंत, आर्वीनाका ते मराठा हॉटेल, सेवाग्राम रेल्वेस्थानक मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बापुरावजी देशमुख यांच्या पुतळ्यापर्यंत आणि धंतोली चौक ते धुनिवाले मठापर्यंत एलईडी पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. यातील काही कामे प्रगतिपथावर असून काही प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे आता शहरातील रस्ते उजळणार असून नागरिकांची गैरसोयही टळणार आहे.सैनिक, पोलिसांकरिता नि:शुल्क आरोग्यसेवानगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबवित देशातील ४६५ अमृत शहरातून ५० वा तर राज्यात ९ वा क्रमांक प्राप्त केला आहे. नगराध्यक्षांच्या नेतृत्वात अधिकारी व पदाधिकारी स्वच्छतेकरिता परिश्रम घेत आहेत.यासोबतच सौंदर्यीकरणावरही जोर असून शहरात बांधण्यात आलेल्या रस्त्यावरील दुभाजकावर रेडियम असलेले आकर्षक पथदिवे लावण्यात येत आहे.या पथदिव्यांवर खाली दोन मीटर पांढरे रेडीयम, पाच मीटर हिरवे रेडियम आणि त्यावर पुन्हा दोन मीटर पांढरे रेडियम लावले आहे. यामुळे दिवस असो वा रात्र परिसर उजळणार आहे. तसेच शहरातील प्रत्येक चौकात वैशिष्ट्यपूर्ण हायमास्ट लावले जात असल्याची माहिती आहे.दुभाजकाला रेलिंग लावून त्यामध्ये जाहिरात फलक बसविण्याचा पालिकेचा मानस आहे. यामुळे शहरातील अनधिकृत फलक हटवून पालिकेला यापासून मोठे उत्पन्न मिळणार असल्याने हाही प्रयत्न पालिकेचा सुरू आहे.ंआॅटोमॅटिक आॅन-आॅफ सर्किटचा वापरशहरातील पथदिव्यांना वीजपुरवठा करण्याकरिता एकूण ४५ मीटरचा वापर केला जातो. या मीटरवरून सायंकाळी पथदिवे सुरू करण्याची व बंद करण्याची जबाबदारी कर्मचाºयांवर सोपविण्यात आली आहे. पण, कधी कर्मचारी सायंकाळी उशिरा पोहोचला, तर पथदिवे सुरू होत नाही किंवा सकाळी उशिरा आला तर पथदिवे सुरूच राहतात. यामुळे नागरिकांची गैरसोय, तर विजेचाही अपव्यय होतो. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आता सर्व मीटरवर आॅटोमॅटिक आॅन-आॅफ सर्किट लावण्यात येणार आहे.वर्धा शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सदोदित प्रयत्नशील आहोत. सध्या पालिका विविध निधीतून विकासकामांवर भर देत आहे. त्यातूनच शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून रस्त्यावरील दुभाजकांवर आकर्षक पथदिवे बसविले जात आहे. काही भागातील काम पूर्णत्वास गेले असून काही काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील या विद्युत प्रणालीवर वॉच ठेवण्यासाठी पालिकेच्या नवीन इमारतीत मॉनिटरिंग लॅब तयार करण्यात येत आहे. अ‍ॅडव्हान्स टेक्नालॉजीच्या माध्यमातून विकासकामांना गती दिली जात आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धाहायमास्टवर लागणार डीपरसध्या शहरात विविध ठिकाणी नागरिकांच्या मागणीवरून हायमास्ट लावण्यात आले आहे. या हायमास्ट लाईटला अधिक वीज लागते. त्यामुळे याचाही भार वीज देयकावर पडत असल्याने आता रात्री ११.३० वाजतानंतर डीपर लावण्यात येणार आहे. यामुळे या हायमास्टचा पॉवर ४० टक्क्यांनी कमी होऊन वीज बचतीला हातभार लागणार आहे.