शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

करवसुलीकरिता नगर परिषदेची धडक मोहीम

By admin | Updated: February 20, 2016 03:01 IST

थकीत करवसुलीकरिता वर्धा पालिकेच्यावतीने शहरात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

तीन दुकानांना ठोकले सील : तिघांची कापली नळजोडणीवर्धा : थकीत करवसुलीकरिता वर्धा पालिकेच्यावतीने शहरात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत तीन दुकानांना कराच्या वसुलीकरिता सील लावण्यात आले. तसेच तीन मालमत्ताधारकांच्या नळाची कापणी करण्यात आली आहे.ही धडक मोहीम पुढील काही दिवस राबविणार असल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. पालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत वॉर्ड क्र. २३ मधील निर्मल बेकरी मार्गावरील थकित कर असणारे मालमत्ताधाकर राधाकिसन बालबक्ष जोशी यांचे दुकान, वॉर्ड क्रं. ८ आर्वी नाका चौकामधील मालमत्ताधारक सत्यजित पांडुरंग वाठमोडे याचे दुकान व वॉर्ड क्र १४ तिलक चौक मधील जयरामदास मुलचंद संगतानी यांच्या दुकानावर जप्तीची कार्यवाही करीत दुकानाला सिल लावण्यात आले. कराचे देयक देत अनेकवेळा भेटी देवून सुद्धा कराचा भरणा न केल्यामुळे वॉर्ड क्रमांक १२ मधील मालमत्ताधारक गुलाब अमृत धोटे, वॉर्ड क्र. १३ मधील लक्ष्मीबाई जागोबा राऊत, वॉर्ड क्र. ३४ मधील कांताबाई भाऊराव लेंडे, वॉर्ड क्र. ३२ मधील वनवास मोटघरे यांच्याकडील नळजोडणी बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. यापुढे सुद्धा जप्ती व धडक कर वसुली मोहीम निरंतर सुरू राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन न.प.च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. सदर जप्ती व वसुलची कार्यवाही कर अधिकारी रवींद्र जगताप, सहा. कर निरीक्षक अशोक नंदरधने, करसंग्राहक ज्ञानेश्वर परटक्के, गजानन पेटकर, एजाज फारूकी, विजय किनगावकर, रमेश भुरे, प्रमोद देशमुख यांनी केलेली आहे.(प्रतिनिधी)