शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वानोडाचे नागरिक जि.प. सभागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 22:11 IST

सेलू तालुक्यातील येळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाºया वानोडा येथे योजनेचे काम पूर्ण झाले आहे; पण अद्याप पाणी पुरवठा सुरू झाला नाही. यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देराजकारण होत असल्याने संताप : पाण्यासाठी होतेय भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील येळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाºया वानोडा येथे योजनेचे काम पूर्ण झाले आहे; पण अद्याप पाणी पुरवठा सुरू झाला नाही. यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काम पूर्ण झालेल्या योजनेतून त्वरित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करीत वानोडाच्या नागरिकांनी थेट जि.प. सभागृहात धडक दिली. ‘आम्हाला पाणी द्या’, अशी मागणी करीत सभागृहाचा परिसर दणाणून सोडला.वानोडा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. मागील एक ते दीड वर्षापासून योजनेचे बरेच काम पूर्णत्वास गेले असल्याने ही योजना कार्यान्वित करून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या योजनेतील जलकुंभाचे बांधकाक करण्यात आले. गावात पाईपलाईनही टाकण्यात आली आहे; पण अद्यापही ही योजना कार्यान्वित झाली नाही. गावाच्या पाण्याचा प्रश्न असल्याने त्वरित या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करीत बुधवारी वानोडा येथील महिला-पुरूषांनी थेट जिल्हा परिषदेचे सभागृह गाठले. स्थायी समितीची बैठक संपताच जि.प. अध्यक्षांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली.नागरिकांची समस्या लक्षात घेत जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी वानोडा येथील पाणी पुरवठा तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. येळाकेळीचे सरपंच वैरागडे यांच्या नेतृत्वात धडकलेल्या वानोडा येथील नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा परिषदेचा परिसर चांगलाच दणाणला होता.पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करा; उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनयेळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या वानोडा येथील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले. योजनेचे बरेच काम पूर्ण झाल्याने लवकरच पाणी पुरवठा सुरू होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती; पण यात राजकारण सुरू झाले आहे. ग्रामस्थांच्या खोट्या सह्या घेऊन काम निकृष्ट झाल्याची तक्रार करण्यात आली. यावरून चौकशीचा ससेमिरा लागला. हा प्रकार दूर करून त्वरित पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.वानोडा येथील नागरिकांनी याबाबत मंगळवारी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांना निवेदन दिले. त्यांनी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे तथा संबंधित विभागाला कळविण्याचे सांगितले. वानोडा येथील पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. गावात पाईपलाईनही टाकण्यात आली. महत्त्वाची दोन्ही कामे एक-दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाली. अद्याप ही योजना कार्यान्वित झाली नाही. या योजनेचे झालेले काम चांगल्या दर्जाचे असून काही काम अद्याप शिल्लक आहे. असे असले तरी पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून पाणी पुरवठा सुरू करावा, अशी रास्त मागणी आहे. निवेदनावर सतीश शेंडे, तेजराम लिबडे, प्रफुल कोरडे, गोपाल लिचडे, कैलास मडावी, पुंडलिक वैरागडे, कान्होजी सुरकार, रामकृष्ण बावणे, रामू धुर्वे, शंकर सुरजुसे, मनोहर सुरतकर, अशोक शेंडे, अजय कंडे, अमोल नरताम, दिलीप कडू, अरविंद शेंडे, चिंधू शेंडे, सुभाष भिसे आदींच्या सह्या आहेत.