शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:44 IST

अल्प प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका आतापासूनच जाणवायला लागला आहे. रसुलाबाद येथे पाणी टंचाईने डोके वर काढले असून येथील हातपंप केव्हाचेच कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देपाणी पुरवठ्याच्या विहिरीने गाठला तळ

ऑनलाईन लोकमतरसुलाबाद : अल्प प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका आतापासूनच जाणवायला लागला आहे. रसुलाबाद येथे पाणी टंचाईने डोके वर काढले असून येथील हातपंप केव्हाचेच कोरडे पडले आहेत. यातच गावाला पाणी पुरविण्याकरिता असलेली सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची विहिरीनेही तळ गाठला आहे. यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच गावात पाण्याकरिता भटकंती सुरू झाल्याचे चित्र आहे.गावात असलेले हातपंप चार महिन्यापूर्वीच आटले. यामुळे संपूर्ण गावाचा डोलारा एकमेव सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवर आला. यातही ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा करणारी विहीर सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा पैसे भरा नळ कनेक्शन घ्या असा नारा दिला. गत तीन महिन्यांपासून नळ जोडण्या वाटपचा सपाटा सुरू केला. आता नळ जोडण्या घेतलेल्यांनी सार्वजनिक नळाचा पाणी पुरवठा बंद करून स्टँड तोडून टाकली. त्यामुळे ज्यांचे घरी नळ नाही अशा नागरिकांवर पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ आली.पाणी पुरवठ्याच्या विहिरीने आता तळ गाठल्याने घरोघरी पोहोचलेल्या नळांना कसे पाणी पोहोचणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पाण्याकरिता मार्चच्या मध्यातच भांडणे सुरू झाली आहे. या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता गावातील नागरिकांकडे असलेल्या विंधन विहिरी किंवा आसपासच्या परिसरात असलेल्य विहिरी अधिग्रहण करण्याचा अधिकार यापूर्वीच ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या आहे. परंतु असे न काता उलट गावाला दुष्काळ मुक्त दाखविण्याचा प्रयत्न येथे सुरू आहे. बस स्टॉप परिसरातील अलोने यांच्या घराजवळील नळाच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह काढल्याने प्रेशर अभावी या परिसरातील नागरिकांच्या घरी नळाला दहा, पंधरा दिवस लोटूनही पाण्याचा थेंब दिसत नाही.राष्ट्रीय पेयजल अंतर्गत येथे मंजूर नवीन विहीर, पाईपलाईन पाण्याचे टाकीचे काम नुकतेच चालू झाले आहे. अपूर्ण कामामुळे त्या विहिरीचे पाणी सुद्धा गावाला मिळणे शक्य नाही. परंतु ग्रामपंचायत मात्र आम्ही लवकरच हे पाणी गावात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत आहे. तर काही राजकीय कार्यकर्ते स्वार्थासाठी गावातील पाणी प्रश्नाला मार्गी लावण्याकडे लक्ष देण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवित आहेत.गावात निर्माण झालेल्या या पाणी टंचाईचे संबंधीत ग्राम सचिवांना विचारणा केली असता पाईप लाईनचा व्हॉल्व्ह लवकरच बसवून पर्यायी व्यवस्था देण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. वास्तवात तसे काही नसल्याने नागरिकांची भटकंती आहे.नव्या विहिरीतही पाणी नाहीगावात पाणी पुरवठा करण्याकरिता नवीन विहीर आणि नवी योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. मात्र पाईपलाईन टाकण्याचे काम अर्धवट असल्याने या उन्हाळ्यात त्या विहिरीचा लाभ होईल असे चित्र गावात दिसत नाही. यातही येथील लोकव्रतिनिधी गावात पाणी टंचाई नसल्याचे भासवत आहे. वास्तवात गावात पाण्याकरिता नागरिकांत भांडणे होत असल्याचे चित्र आहे. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.